पावसाळ्यातही मराठवाड्याचा टँकरवाडा
By Admin | Published: June 15, 2016 11:51 PM2016-06-15T23:51:35+5:302016-06-16T00:13:35+5:30
औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,९७२ गावे आणि १ हजार १७ वाड्यांना ४ हजार १५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. आज १४ जूनपर्यंत ही सर्वात मोठी टँकरची आकडेवारी आहे.
औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,९७२ गावे आणि १ हजार १७ वाड्यांना ४ हजार १५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. आज १४ जूनपर्यंत ही सर्वात मोठी टँकरची आकडेवारी आहे. पावसाळा सुरू झाला असताना विभागात ६० लाख ५९ हजार २७५ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या वर्षी मे अखेरपर्यंत ३ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा गेला होता.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर १ हजार टँकरचा आकडा होता. यावर्षी जूनच्या दुसऱ्या आठवडाअखेरपर्यंत ४ हजार टँकरचा आकडा कायम आहे.
विभागात १० जूनपर्यंतच्या अहवालानुसार टँकरची संख्या जून अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
विभागात एकूण ८ हजार ३४ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मागील आठवड्यात २ हजार ९५६ गावे आणि १ हजार २७ वाड्यांना ४ हजार ३ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. अशाप्रकारे पावसाळ्यातही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे.
४९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात ३ जूनपर्यंत ४९६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यातील २६२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ११६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. ११३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ७५, जालन्यात ४७, परभणी ४६, हिंगोली २८, नांदेड ७६, बीडमध्ये ९१, लातूर ६२, उस्मानाबादमध्ये ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.