नगरपंचायतचे उधारीवर नळ कनेक्शन

By Admin | Published: April 29, 2017 12:51 AM2017-04-29T00:51:13+5:302017-04-29T00:52:46+5:30

मंठा : शहरातील नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, शहरात विविध भागांत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Tap connection on the borrowings of the Nagar Panchayat | नगरपंचायतचे उधारीवर नळ कनेक्शन

नगरपंचायतचे उधारीवर नळ कनेक्शन

googlenewsNext

मंठा : शहरातील नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, शहरात विविध भागांत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे एक हजार नागरिकांनी नवीन नळ कनेक्शन घेतले आहे. त्यापैकी ७०० नगदी तर ३०० उधारीवर देण्यात आल्याने अडचणीत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंठा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पातून आणण्यात आलेल्या नवीन नळयोजनेचे मुबलक पाणी शहरवासियांना मिळत असल्याने १२ महिने पाणी टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या मंठेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील सर्वच प्रभाग व नवीन वस्त्यांमध्ये नळयोजनेच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. तर नव्याने सुमारे साडेसहा किलोमीटर पाईपलाईन करण्यात आली आहे. तर आणखी अडीच कि़मी. पाईपलाईनचे काम सुरू असल्याचे नगराध्यक्षा पार्वती बोराडे यांनी सांगितले.
या नळजोडणीमुळे नगर पंचायतचे उत्पन्न वाढले असून, यापोटी सुमारे ७०० कनेक्शन प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे २१ लाख रुपये मिळाले आहेत. उधारीवरील ३०० कनेक्शनची रक्कम ९ लाख रुपये आठवडाभरात मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा बोराडे यांनी व्यक्त केला. नवीन नळांना मुबलक पाणी येत असल्याने कनेक्शनची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे मत उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे यांनी व्यक्त केले. शहरात दररोज किमान ४५ ते ६० मिनिट पाणी सोडण्यात येत आहे. उन्हाळ्यात मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. नळयोजनेसाठी खोदण्यात आलेले मुख्य रस्त्यावरील चरी व्यवस्थित न बुजवल्याने नागरिकांना मोठा त्रास होत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Tap connection on the borrowings of the Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.