तपोवन एक्स्प्रेसचे ब्रेक रोटेगावमध्ये जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:02 AM2018-04-11T00:02:40+5:302018-04-11T00:05:01+5:30
मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्रीकार बोगीचे (रसोई यान) अचानक ब्रेक जाम झाल्याची घटना रोटेगाव रेल्वेस्टेशनवर उघडकीस आली. ब्रेक जाम झाल्याने बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता; परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्रीकार बोगीचे (रसोई यान) अचानक ब्रेक जाम झाल्याची घटना रोटेगाव रेल्वेस्टेशनवर उघडकीस आली. ब्रेक जाम झाल्याने बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता; परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.
तारूर रेल्वेस्टेशनवरून रेल्वे रवाना झाल्यानंतर काही अंतरावर तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्री कार बोगीतून धूर निघत होता. अशा परिस्थितीतही ही रेल्वे धावत होती. दुपारी १२.३७ वाजता ही रेल्वे रोटेगाव स्टेशनवर पोहोचली. तेव्हा हा प्रकार रेल्वे कर्मचारी, रेल्वे प्रवासी सेनेचे उपाध्यक्ष सुरेंद्र संचेती यांच्या निदर्शनास आला. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी ही बाब स्टेशन मास्तर सतीश लोभी यांना कळविली. या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीची दुरुस्ती केली. येथील दुरुस्तीनंतरही औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरही दुरुस्ती आणि तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. खबरदारी म्हणून परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळ, दौलताबाद रेल्वेस्टेशनवरील अधिकारी-कर्मचाºयांना माहिती देण्यात आली. दुपारी १.४५ वाजता ही रेल्वे औरंगाबादला पोहोचली. या ठिकाणी तांत्रिक विभागाचे अभियंता कुणाल रत्नपारखी, कर्मचारी जानी कादर यांनी पेंट्री कारचे निरीक्षण करून आवश्यक दुरुस्ती केली.