पालिकांच्या तिजोरीत सव्वा कोटीवर कर..!
By Admin | Published: November 16, 2016 12:10 AM2016-11-16T00:10:45+5:302016-11-16T00:08:22+5:30
उस्मानाबाद : शासनाने पाचशे- हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी २४ नोव्हेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर जुन्या नोटांमधून भरण्याची मुदत दिली आहे़
उस्मानाबाद : शासनाने पाचशे- हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी २४ नोव्हेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर जुन्या नोटांमधून भरण्याची मुदत दिली आहे़ ११ ते १४ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ८ पालिका व दोन नगर पंचायतींकडे तब्बल एक कोटी ३७ लाख ९५ हजार ५९८ रूपयांचा कर जमा झाला आहे़ तर पुढील आठ दिवसात या करामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे़
केंद्र शासनाने हजार-पाचशे रूपयांच्या नोटा ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली़ विशेषत: दोन नंबर धंदे आणि पैशांचा काळाबाजार करणाऱ्यांची झोपच उडाली आहे़ बाजारपेठेत जुन्या हजार-पाचशेच्या नोटा स्विकारल्या जात नाहीत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत़ असे असले तरी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर या जुन्याा नोटांमधून भरण्याची मुदत दिली होती़ याची संधी साधत जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी जिल्ह्यातील ८ नगर पालिका व २ नगर पंचायतींकडे तब्बल १ कोटी ३७ लाख ९५ हजार ५९८ रूपयांचा कर भरला आहे़ पहिल्या दिवशी तब्बल ७३ लाख ४२ हजार ११७ रूपयांचा कराचा भरणा झाला़ यात उस्मानाबाद पालिकेत ३० लाख २८ हजार ७०० रूपये, तुळजापूर पालिकेत १० लाख ७३ हजार ९१७ रूपये, नळदुर्ग पालिकेत ४९ हजार ७०० रूपये, भूूम पालिकेत ४ लाख ११ हजार रूपये, कळंब पालिकेत ४ लाख ९४ हजार ८०० रूपये, परंडा पालिकेत ३ लाख ५३ हजार, उमरगा १४ लाख ७१ हजार, मुरूम ४ लाख, वाशी ४ लाख ४८ हजार तर लोहारा नगर पंचायतीत २३ हजार असा ७३ लाख ४२ हजार ११७ रूपयांचा भरणा झाला़
दुसऱ्या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद पालिकेत ८ लाख १७ हजार ९०० रूपये, तुळजापूर पालिकेत ३ लाख १७ हजार ९१७ रूपये, नळदुर्ग पालिकेत ७६ हजार, भूूम पालिकेत १ लाख २ हजार, कळंब पालिकेत ३ लाख ५२ हजार, परंडा पालिकेत १ लाख ६० हजार, उमरगा २ लाख ७८ हजार, मुरूम ९५ हजार, वाशी २ लाख ३४ हजार तर लोहारा नगर पंचायतीत ९५ हजार असा २५ लाख २७ हजार ८१७ रूपयांचा भरणा झाला़
१३ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद पालिकेत ५ लाख २५ हजार ८०० रूपये, तुळजापूर पालिकेत १ लाख ७५ हजार ७६६, नळदुर्ग पालिकेत १२ हजार ४००, भूूम पालिकेत ६९ हजार, कळंब पालिकेत १ लाख ८३ हजार, परंडा पालिकेत ७६ हजार, उमरगा १ लाख १८ हजार, मुरूम ५० हजार, वाशी ५३ हजार तर लोहारा नगर पंचायतीत २५ हजार असा १२ लाख ८८ हजार ६६६ रूपयांचा भरणा झाला़
१४ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद पालिकेत १५ लाख ५९ हजार ५०० रूपये, तुळजापूर पालिकेत ३ लाख ५ हजार २९८, नळदुर्ग पालिकेत १३ हजार ६००, भूूम पालिकेत ७७ हजार, कळंब पालिकेत ३ लाख ७३ हजार, परंडा पालिकेत १ लाख ६० हजार, उमरगा ७८ हजार ६००, मुरूम २५ हजार, वाशी ११ हजार तर लोहारा नगर पंचायतीत ३४ हजार असा २६ लाख ३६ हजार ९९८ रूपयांचा भरणा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ येणाऱ्या काळात ही रक्कम आणखी वाढणार आहे.(प्रतिनिधी)