विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठवले टीसी; युवासैनिकांनी ठोकले स्वामीविवेकानंद अकॅडमीला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 08:03 PM2021-05-15T20:03:52+5:302021-05-15T20:05:07+5:30
शिक्षणाधिकार्यांनी शाळा बंदचा प्रस्ताव फेटाळलेला असतांना विद्यार्थ्यांना टिसी कसे देण्यात आले.
औरंगाबाद ः चिकलठाणा येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी शाळेतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना टिसी पोस्टाने पाठवून शाळा बंद करण्यात येत आहे. तसेच उर्वरीत फि भरण्याचे पत्र पालकांना पाठवले. यासंदर्भात पालकांनी युवासेनेच्या पदाधिकार्यांची भेट घेतली. याप्रकरणाची शहानिशा करण्यासाठी पदाधिकार्यांनी शाळा गाठली. मात्र, शाळेकडून कोणताच प्रतिसान न मिळाल्याने युवासैनिकांनी शाळेला टाळे टोकले.
शाळेचे मुख्याध्यापक संस्थाचालकांना यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात यश आले नाही. दरम्यान पोलीसही शाळेजवळ पोहचले. पोलीस आणि पदाधिकार्यांत शाब्दीक चकमकही उडाली. शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भवितव्याशी शाळेने खेळू नये. शिक्षणाधिकार्यांनी शाळा बंदचा प्रस्ताव फेटाळलेला असतांना विद्यार्थ्यांना टिसी कसे देण्यात आले. या मनमानीविरोधात तिव्र आंदोलन छेडू असे युवासेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, जिल्हा समन्वयक संदीप लिंगायत, उपजिल्हाधिकारी गणेश तेलोरे, शहरप्रमुख शेखर जाधव, सागर खरगे, अवधुत अंधारे,शहर चिटणीस दत्ता शेलार, शहर समनव्यक नंदू म्हस्के, अभिजित थोरात आदींनी स्पष्ठ केले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षकांसह युवासैनिकांची उपस्थिती होती. यासंबंधी शाळा प्रशासनाची बाजु समजुन घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. तर पालकांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त, पोलीस निरिक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्या निवेदनावर ४० पालकांच्या सह्या आहेत.