शिक्षक मतदारसंघ निवडणूक; जिल्ह्यात ८९ टक्के मतदान
By Admin | Published: February 4, 2017 12:32 AM2017-02-04T00:32:13+5:302017-02-04T00:35:29+5:30
बीड : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात जवळपास ८९ टक्के मतदान झाले आहे
बीड : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात जवळपास ८९ टक्के मतदान झाले आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडली.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बीड जिल्ह्यात एकूण ६० मतदान केंद्रांवर अत्यंत शांततामय वातावरणात मतदान झाले. जिल्ह्यात सुमारे १० हजार ३९५ मतदार असून, यापैकी जवळपास ९ हजार २६५ म्हणजे अंदाजे ८९.१३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी मतदान प्रक्रि येवर बारकाईने लक्ष ठेवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. पोलीस विभागानेही कडक बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही काही मतदान केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. मतमोजणी ६ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होणार आहे. (प्रतिनिधी)