विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक दारोदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:04 AM2021-06-18T04:04:36+5:302021-06-18T04:04:36+5:30
खासगी शाळांमध्ये हे सुरू आहे. शहरात हजारो विद्यार्थी खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. अनेक शाळांना गतवर्षी पुरेसे विद्यार्थी ...
खासगी शाळांमध्ये हे सुरू आहे. शहरात हजारो विद्यार्थी खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. अनेक शाळांना गतवर्षी पुरेसे विद्यार्थी मिळाले नाहीत. यावर्षी तरी अपेक्षित विद्यार्थी मिळून तुकडी टिकेल, तुकडी टिकली तर शिक्षक टिकतील असा दम शिक्षकांना भरला जात आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा असतानाच अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या मन:स्थितीत नाहीत. दुसरीकडे मात्र शिक्षकांना सारखा तगादा लावण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमातील शाळेमधील विद्यार्थी संख्या वाढत असताना मराठी माध्यमाच्या शाळांना मात्र घरघर लागलेली आहे. शहरातील जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या टिकविण्याचे फार मोठे अग्निदिव्य आहे. पालक फी भरण्यास तयार नसल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळाही संकटात सापडल्या आहेत. विद्यार्थी आणावेत कुठून, असा प्रश्न आता शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे स्लम एरियातून विद्यार्थी शोधण्याचे मार्ग अवलंबले जात आहेत.