शिक्षक करणार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे शुटींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:55 PM2017-11-15T23:55:44+5:302017-11-15T23:55:56+5:30
जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कलागुण अवगत असतात. परंतु ते उघड होत नसल्याने अनेक कलेत पारंगत असलेले विद्यार्थीही मागेच राहतात. मात्र आता असे होणार नाही. शिक्षण विभागाच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मोबाइल अॅपद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेऊन शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध कलागुण अवगत असतात. परंतु ते उघड होत नसल्याने अनेक कलेत पारंगत असलेले विद्यार्थीही मागेच राहतात. मात्र आता असे होणार नाही. शिक्षण विभागाच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मोबाइल अॅपद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा शोध घेऊन शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती केली जाणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होणार असल्याचे कार्यशाळेत सांगण्यात आले.
जि. प. सभागृहात बुधवारी डायटच्या वतीने तंत्रज्ञ शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आवाजाचे आॅडिओ कसे करावेत, व्हिडीओ कसा करावा यावर भूषण कुलकर्णी, एकनाथ कोर यांनी सखोल मार्गदर्शन केले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर वाढेलच परंतु शाळेतील उपक्रमांचा व्हिडीओ पालकांनी पाहिल्यानंतर आपला पाल्य त्या व्हिडीओत दिसल्याने आनंद होणार आहे. जर पाल्य व्हिडीओत दिसला नाही तर आपलाही पाल्य असा झळकावा म्हणून पाल्याला शाळेत पाठविणार, त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढून त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तसेच उत्कृष्ट दर्जाचे व्हिडीओ किंवा आॅडिओ केंद्रांतर्गत येणाºया शाळेत दाखविले व ऐकविले जाणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे व त्यांच्यातील सुप्तगुण कसे ओळखावे याची माहिती देण्यात आली. मात्र शिक्षकांनीच जर हा उपक्रम यशस्वीपणे राबविला तर खरोखरच विद्यार्थी चमकल्याशिवाय राहणार नाहीत. नसता कार्यशाळा घेऊनही उपयोग होणार नाही.