काळ्या फिती लावून शिक्षकांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:04 AM2017-11-05T00:04:20+5:302017-11-05T00:04:31+5:30
२७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करून सर्वसमावेशक बदली धोरण तयार करावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा शिक्षक समन्वय महासंघाच्या वतीने शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानोपासक महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करून सर्वसमावेशक बदली धोरण तयार करावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा शिक्षक समन्वय महासंघाच्या वतीने शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानोपासक महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला.
शालेय शिक्षण विभागाच्या चट्टोपाध्याय व निवड श्रेणी संदर्भातील शासन निर्णय मागे घेण्यात यावा, शिक्षकांसह कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मुख्याध्यापक व शिक्षकांकडे असलेली सर्व आॅनलाईन कामे काढून घ्यावीत, एमएससीआयटीस २०१८ पर्यंत मुदतवाढ द्यावी तसेच शासनस्तरावर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी परभणी जिल्हा शिक्षक समन्वय महासंघाच्या वतीने शनिवारी जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरून काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करीत मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा उड्डाणपुलावरून बसस्थानक, रेल्वेस्थानक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामार्गे जिल्हा कचेरीवर नेण्यात आला़ या मोर्चा दरम्यान शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजी केली़ या मोर्चात राम लोहट, ज्ञानेश्वर लोंढे, किशन इदगे, मधुकर कदम, डॉ़ दिलीप श्रृंगारपुतळे, सोपान बने, भगवान पारवे, माधवराव सोनवणे, शेख नूर, शंकर खिस्ते, विलास भालेराव, सतीश कांबळे, ए़डी़ जल्हारे, सुशील काकडे, सायस चिलगर, उज्ज्वला जाधव, सविता चव्हाण, बाळासाहेब यादव, एस़एस़ भिसे आदींचा सहभाग होता़ दरम्यान महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़