जिल्हा कचेरीवर शिक्षकांचा मोर्चा
By Admin | Published: June 18, 2017 12:09 AM2017-06-18T00:09:33+5:302017-06-18T00:12:19+5:30
नांदेड : शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यावर्षी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यावर्षी करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ यामध्ये २००५ नंतर सेवेतील सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांना ४ हजार ३०० ग्रेड पे लागू करण्यात यावा, वेतन १ तारखेला त्यांच्या खात्यात जमा करावे, उपशिक्षणाधिकारी व अन्य पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांना पात्र ठरवावे, शालेय पोषण आहार, शाळेच्या इतर कामातून शिक्षकांना वगळावे, सर्व शाळांना डिजिटल करण्यासाठी अनुदान द्यावे, विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात यावे इ. मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे नीळकंठ चोंडे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देवीदास बस्वदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, बहुजन शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष डी़ एऩ हनमंते, चंद्रकांत दामकर, विद्रोही शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गुणवंत काळे, दिलीपराव देवकांबळे, बालाजी पांडागळे, शिवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल ताकबिडे, अशोक पाटील, संतोष अंबुलगेकर, डी़ एम़ पांडागळे, संजय कोठाळे, गणू जाधव, बालासाहेब लोणे, नागभूषण दुर्गम, मंगनाळे, चंद्रकांत कुनके, अनिरूद्ध कसबे, व्यंकटराव जाधव, प्रलोभ कुलकर्णी आदी उपस्थित होते़