झेडपीच्या प्रांगणात शिक्षकाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:55 AM2017-09-27T00:55:08+5:302017-09-27T00:55:08+5:30
जिल्हा परिषदेच्या परिसरात अधिकाºयांवर मुक्ताफळे उधळत गोंधळ घालणाºया केज तालुक्यातील शिक्षकावर बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी कारवाईचे संकेत मिळाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेच्या परिसरात अधिकाºयांवर मुक्ताफळे उधळत गोंधळ घालणाºया केज तालुक्यातील शिक्षकावर बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी कारवाईचे संकेत मिळाले आहेत.
सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात एका शिक्षकाने तासभर गोंधळ घातला. त्याच्या वर्तनामुळे परिसरातील लोकांची करमणूक झाली तर अधिकारी वैतागले. अखेर ही बाब वरिष्ठांना कळाल्यानंतर गोंधळ घालणाºया शिक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र ही बाब शिक्षकासोबत आलेल्या हितचिंतकांच्या लक्षात आल्याने या शिक्षकाला परिसरातून बाहेर नेले गेले.
मिळालेल्या माहितीनुसार हे शिक्षक महाशय केज तालुक्यातील चिंचोलीमाळी जि.प. शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांना यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प.ने जाहीर केलेला आहे. आचारसंहितेमुळे पुरस्कार वितरण झाले नाही. सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांनी गोंधळ का घातला, याचे कारण समजू शकले नाही. अधिकारी, कर्मचाºयांवर मुक्ताफळे उधळणाºया या शिक्षकाच्या बेशिस्त वर्तनाबाबत कारवाईचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राजकीय दबावही वाढल्याने तूर्त निलंबनाची कारवाई थांबल्याची माहिती मिळाली आहे. आदर्श पुरस्कार जाहीर होणाºया शिक्षकाकडून बेशिस्त वर्तनाबद्दल कारवाईची शक्यता आहे.