‘आॅनलाईन’च्या नावाखाली शिक्षकांच्या पगारांचा गोंधळ
By Admin | Published: May 14, 2014 12:00 AM2014-05-14T00:00:42+5:302014-05-14T00:27:57+5:30
बीड : जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार आॅनलाईनच्या गोंधळामुळे अडकून पडला आहे.
बीड : जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार आॅनलाईनच्या गोंधळामुळे अडकून पडला आहे. मे महिन्यापासून शिक्षकांचे पगार आॅनलाईन पद्धतीने करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. याची प्रक्रिया एप्रिल महिन्यातच सुरू झाली होती. त्यामुळे मे महिन्यात शिक्षकांचे पगार होतील, अशी भाबडी आशा शिक्षक आणि विद्यालयातील कर्मचार्यांमध्ये निर्माण झाली होती. अर्धा मे महिना संपत आला तरी अनुदानित शाळेवरील शिक्षकांचे पगार झाले नाहीत. वेतन पथकाचे अधिकारी आॅनलाईनच्या नावाखाली वेतनासाठी विलंब करत असल्याचा आरोप मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव राजकुमार कदम यांनी केला आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने शिक्षकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांच्या पगारी कराव्यात. परंतु आॅनलाईनच्या नावाखाली पगार रखडून ठेवणे हे चुकीचे असल्याचे मतही कदम यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)