शिक्षकांसाठी आसुसलेले चिमुक ले थेट जि.प.मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:52 PM2019-07-09T23:52:33+5:302019-07-09T23:52:54+5:30

कसाबखेडा येथील जि.प. उर्दू शाळेत अपुऱ्या शिक्षकांअभावी चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता ९ वे व १० वी मध्ये एकूण १०० च्या वर विद्यार्थी शिकत आहेत. यासाठी वारंवार शिक्षकांची मागणी करूनही प्रशासनाकडून शिक्षक उपलब्ध करून दिले जात नसल्याने आज अखेरीस कसाबखेडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोरच चिमुकल्यांची शाळा भरवली.

Teacher's tweaking leak in direct ZP | शिक्षकांसाठी आसुसलेले चिमुक ले थेट जि.प.मध्ये

शिक्षकांसाठी आसुसलेले चिमुक ले थेट जि.प.मध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देकसाबखेडा जि.प. उर्दू शाळा : शंभर विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक


औरंगाबाद : कसाबखेडा येथील जि.प. उर्दू शाळेत अपुऱ्या शिक्षकांअभावी चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता ९ वे व १० वी मध्ये एकूण १०० च्या वर विद्यार्थी शिकत आहेत. यासाठी वारंवार शिक्षकांची मागणी करूनही प्रशासनाकडून शिक्षक उपलब्ध करून दिले जात नसल्याने आज अखेरीस कसाबखेडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोरच चिमुकल्यांची शाळा भरवली.
जिल्हा परिषद प्रशाला कसाबखेडा (ता. खुलताबाद) या शाळेत २०१८-१९ च्या संच मान्यतेनुसार उर्दू माध्यमाच्या इयत्ता ८ वी वर्गात ४५ व इयत्ता ९ वी वर्गामध्ये ५२ विद्यार्थी संख्या आहे. तरीही इयत्ता ९ वी व १० वीसाठी केवळ एकच उर्दू माध्यमाचे पद मंजूर आहे. संच मान्यता दुरुस्त होऊन इयत्ता ८ वीसाठी व ९ वीसाठी पदे मंजूर होणे आवश्यक होते; परंतु एकच पद मंजूर झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सन २०१९-२० वर्षात ९ वीचे विद्यार्थी १० वीत जाणार असल्याने १० वीची विद्यार्थी संख्या ५२ होणार आहे. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या इयत्ता ८ वीसाठी १ व ९ वी आणि १० वीसाठी ४ असे एकूण पाच पदांची आवश्यकता आहे. वारंवार मागणी करूनही उर्दू शिक्षक दिले जात नसल्यामुळे मंगळवारी थेट शिक्षण विभागाच्या आवारातच शाळा भरविण्यात आली.
जिल्हा परिषद कसाबखेडा शाळेत २०१८-१९ च्या संच मान्यतेनुसार ९ वी व १० वीसाठी मराठी माध्यमाला ४ शिक्षकांची पदे मंजूर असून कार्यरत पदे ५ शिक्षक आहेत, तर उर्दू माध्यमाचे १ पद मंजूर असताना एकही उर्दू शिक्षक कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संच मान्यता दुरुस्त होऊन पुरेसे शिक्षक देण्याची मागणी कसाबखेडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्याकडे केली.

तात्पुरते नियुक्त शिक्षक रुजू झालेच नाहीत
या प्रशालेत उर्दू माध्यमाचा एकही शिक्षक कार्यरत नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशान्वये बहुविध प्रशाला सातारा येथील सहशिक्षक पठाण जाकेर यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती; परंतु ते आजारी रजेवर गेले व नंतर परस्पर पुन्हा सातारा शाळेतच रुजू झाले. त्यामुळे कसाबखेडा येथे उर्दू शिक्षकच नाही. सध्या गटशिक्षणाधिकारी स्तरावरून दोन उर्दू शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Teacher's tweaking leak in direct ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.