शिक्षक सेनेचे जि.प. समोर घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:33 AM2018-07-08T01:33:30+5:302018-07-08T01:34:13+5:30

राज्य सरकारने जि.प. शाळेतील शिक्षकांच्या केलेल्या बदल्यांमध्ये नियमांची पायामल्ली केली आहे. यात अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून अतिरिक्त लाभ उठविला असून, अशा शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. समोर शनिवारी (दि.७) दुपारी ३ वाजता घंटानाद आंदोलन केले.

 Teacher's zip Front Ghantanad movement | शिक्षक सेनेचे जि.प. समोर घंटानाद आंदोलन

शिक्षक सेनेचे जि.प. समोर घंटानाद आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य सरकारने जि.प. शाळेतील शिक्षकांच्या केलेल्या बदल्यांमध्ये नियमांची पायामल्ली केली आहे. यात अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून अतिरिक्त लाभ उठविला असून, अशा शिक्षकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. समोर शनिवारी (दि.७) दुपारी ३ वाजता घंटानाद आंदोलन केले.
जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यांमध्ये बोगस लाभार्थ्यांची संख्या सहाशेहून अधिक आहे. त्यातील केवळ ६० ते ७० शिक्षकांची कागदोपत्री चौकशी करून सुनावणी घेतली. चौकशी अहवाल व बोगस लाभार्थी शिक्षकांची यादी प्रसिद्ध करून कारवाई केलेली नाही. संवर्ग १ व २ बदली लाभार्थी शिक्षकांची सरसकट चौकशीची आवश्यकता असताना शिक्षकांनाच तक्रारी करण्यास सांगितले. तरीही प्रशासनाने यात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शिक्षकांनी मोठा घंटा आणून वाजवला.
या आंदोलनस्थळी शिवसेना नेते व खासदार चंद्रकांत खैरे यांनी भेट दिली. शिक्षक सेनेचे शिष्टमंडळ खा. खैरे यांच्या सोबत जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या भेटीला गेले. तेथे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. खा. खैरे यांनी शिक्षक सेनेने केलेल्या मागण्यांवर १५ दिवसांच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांनी विभागाचे प्रधान सचिव गुप्ता यांच्याशीही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत शिक्षकांच्या मागण्या मांडल्या. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी अनियमिततेची पंधरा दिवसांत चौकशी करण्यात येईल, जिल्ह्यातील बदल्यांची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे शिक्षक सेनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. सदानंद माडेवार, लक्ष्मण ठुबे, संतोष आढाव, दीपक पवार, प्रभाकर पवार, दत्ता पवार, संदीप चव्हाण, कल्याण पवार, नितीन पवार, अनिल काळे, दिलीप ढाकणे, योगेश दांगुर्डे, सदाशिव कांबळे, मुरलीधर चव्हाण, विशाल चौधरी, गणेश पिंपळे आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या मागण्या
अन्यायग्रस्त शिक्षकांच्या तक्रार, अर्जाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
४ बदली झालेल्या शिक्षकांची संवर्गनिहाय जिल्हास्तरावर यादी प्रसिद्ध करावी.
४संवर्ग १ व २ च्या लाभार्थींमधील लाभार्थ्यांची सरसकट चौकशी करावी, यासाठी मेडिकल बोर्डाकडून तपासणीसह प्रमाणपत्रांची पडताळणी करावी.
४ विस्थापित सर्व शिक्षकांना बोगस लाभार्थ्यांच्या रिक्त होणाºया जागी व कायमस्वरूपी रिक्तपदी पुनर्स्थापना द्यावी.

Web Title:  Teacher's zip Front Ghantanad movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.