पथकाने केली १३ धार्मिक स्थळांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:06 AM2017-08-04T01:06:11+5:302017-08-04T01:06:11+5:30

महापालिकेने गुरुवारी शहरातील १३ धार्मिक स्थळांवर कारवाई केली.

 The team has taken action against 13 religious places | पथकाने केली १३ धार्मिक स्थळांवर कारवाई

पथकाने केली १३ धार्मिक स्थळांवर कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेने गुरुवारी शहरातील १३ धार्मिक स्थळांवर कारवाई केली. कारवाईदरम्यान खिंवसरा पार्क, काचीवाडा येथे तणाव, तर भांडीबाजारमध्ये वातावरण भावुक झाले होते. न्यायालयाच्या आदेशाने मनपाकडून धार्मिक स्थळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. आजवर ३५ पेक्षा जास्त धार्मिक स्थळे काढण्यात आली आहेत. काचीवाड्यातील धार्मिक स्थळासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली.
गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून वसंत निकम आणि वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांच्या पथकाने सकाळी जालना रोड, मोंढा नाका उड्डाणपुलालगतच्या इब्राहीम मशिदीच्या बाजूला असलेला सादात पीर साब दर्गा हटविला. त्यानंतर उल्कानगरी, खिंवसरा पार्कमधील सिद्धी विनायक गणेश मंदिराकडे पथकाने मोर्चा वळविला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह नगरसेवक नितीन साळवी, सिद्धांत शिरसाट, संजय बारवाल, अनिल लहाने व इतरांनी पथकाला अडविल्याने तणाव निर्माण झाला होता. पूजा करण्यासाठी भाविकांनी वेळ घेतल्याने दुपारी साडेतीनपर्यंत पथक तेथेच थांबले. विधिवत मूर्ती हटविल्यानंतर पथकातील के. डी. देशमुख, फारुख खान, पोलीस उपनिरीक्षक अविनाश आघाव आदींच्या उपस्थितीत कारवाई करून मंदिर हटविले.
उपायुक्त अय्युब खान, जयंत खरवडकर यांचे पथक कासारी बाजार येथील आस्थाना काढण्यासाठी गेले असता स्थानिक व्यापाºयांनी विरोध केला. सामंजस्याने तेथील आस्थाना काढला. त्यानंतर सीपी आॅफिस रोडवरील हमवी औलवी दर्गा पाडण्यात आला. त्यानंतर नागेश्वरवाडीतील सय्यद सादात दर्गा काढण्यात आला. यात बी.डी. फड यांचा समावेश होता. तिसरे पथक उपायुक्त रवींद्र निकम आणि सी. ए. अभंग, एस.एस. कुलकर्णी, एन. जी. दुर्राणी यांचे होते. त्यांनी ज्युबली पार्क येथील दर्गा हटविला. त्यानंतर एन-६ रोडवरील तीन धार्मिक स्थळे काढण्यात आली. फकीरवाडी चुनाभट्टी येथील मुंजा, मारोती मंदिर काढण्यात आले. चौथे पथक उपायुक्त एम. बी. काजी, ए. बी. देशमुख यांचे होते. त्यांनी अदालत रोडवरील सेशन कोर्टामागील दर्गा, जालना रोडवरील चिकलठाण्यातील दर्गा काढला. शुक्रवारी सर्व पथकांकडून सकाळी पाहणी करून नंतर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title:  The team has taken action against 13 religious places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.