विहिरीच्या चौकशीसाठी पथक
By Admin | Published: August 19, 2016 12:47 AM2016-08-19T00:47:53+5:302016-08-19T01:01:00+5:30
चाकूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यातील हाडोळी येथे दहा लाभार्थ्यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आली होती़
चाकूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यातील हाडोळी येथे दहा लाभार्थ्यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आली होती़ त्यापैकी सरपंच शंकरराव चाटे यांनी विहीर न खोदता अनुदान व मजूरी लाटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते़ या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी विहीरीच्या चौकशीसाठी दोन पथके नेमली आहेत़ या पथकाला सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत़
पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नाबदे व चाकूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस़जी़ पुट्टेवाड यांचे एक पथक असून, पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी राजूरे, चाकूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एम़डी़ बेजगमवार यांचे एक पथक नियुक्त केले आहे़
पथकाने चाकूर तालुक्यातील मौजे हाडोळी येथे सिंचन विहीर लाभार्थी सरपंच शंकरराव बाबुराव चाटे यांच्या संबंधित गट नंबरमध्ये जावून विहीरीच्या कामाची चौकशी करावी व त्या संबंधीचा अहवाल तातडीने तहसील कार्यालयात सादर करावा, असे या आदेशात तहसीलदारांनी म्हटले आहे़ १३ आॅगस्ट रोजी हे आदेश निर्गमित केले आहेत़ (वार्ताहर)
मार्कआऊटनुसार विहिरचे काम : शंकरराव चाटे
४१५ आॅगस्ट २०१५ रोजी ग्रामसभा घेऊन सिंचन विहीरच्या दहा प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली़ सदरील दहाही प्रस्ताव चाकूर पंचायत समितीकडे मंजुरीसाठी सादर केले होते़ पंचायत समितीने दहाही प्रस्ताव मंजूर केले़ गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार विहीरचे काम सुरू करण्यात आले़ मार्कआऊट दिलेल्या ठिकाणी चार विहीरचे काम सुरू करण्यात आले़ सदरील विहीरीचे काम मजुरामार्फत करण्यात आले आहे़ या ग्रामसभेला विवेक बडे यांचे वडील माणिक बडेही हजर होते़ मात्र विवेक बडे यांनी खोटी तक्रार केली असल्याचे सरपंच शंकरराव बाबुराव चाटे यांनी म्हटले आहे़