पथकांनी काढले १९८१ होर्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:04 AM2018-07-30T01:04:36+5:302018-07-30T01:04:58+5:30
खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची व्यापक मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. पोलीस आणि महापालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेत दुसऱ्या दिवशी तब्बल १९८१ लहान मोठे होर्डिंग काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची व्यापक मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. पोलीस आणि महापालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेत दुसऱ्या दिवशी तब्बल १९८१ लहान मोठे होर्डिंग काढण्यात आले. नऊ वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली. ठिकठिकाणी कारवाईला विरोध करण्यात आला. मंगळवारपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा विडाच महापालिकेने उचलला आहे. भिंतीवर रंगविलेल्या व्यावसायिक जाहिरातींचे काय करावे, असा प्रश्न पथकांना पडला आहे.
महापालिकेची परवानगी न घेता शहरातील रस्ते, चौक, पदपथ, पथदिवे, दुभाजकांवर लहान-मोठे होर्डिंग, फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या अनधिकृत होर्डिंगची संख्या जवळपास १० हजारांच्या आसपास आहे.