तांत्रिक अधिकारी सेवेतून मुक्त

By Admin | Published: July 14, 2017 12:07 AM2017-07-14T00:07:01+5:302017-07-14T00:10:53+5:30

हिंगोली : मग्रारोहयोच्या कामांमध्ये दिरंगाई अधिकाऱ्यास बैठकीतून हाकालत सेवेतून मुक्त करण्याचा आदेश दिला आहे.

Technical officers are free from the service | तांत्रिक अधिकारी सेवेतून मुक्त

तांत्रिक अधिकारी सेवेतून मुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांमध्ये दिरंगाई करून प्रशासकीय कामे केली जात नसल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळमनुरीच्या तांत्रिक अधिकाऱ्यास बैठकीतून हाकालत सेवेतून मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. तर बीडीआेंनाही चांगलेच धारेवर धरत अकरा कलमी कार्यक्रम न राबविल्यास कारवाईचा इशारा दिला.
मग्रारोहयो योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यात कळमनुरीचे तांत्रिक अधिकारी जयदीपकुमार बोरगावकर यांना जिओ टॅगिंग, अ‍ॅसेट मॅपिंग नसल्याने व सतत गैरहजर राहात असल्याने थेट सेवामुक्त करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर इतर कामांचाही आढावा घेतला. यात मजुरांच्या जॉबकार्ड पडताळणीचे काम केले जात नसल्याचे त्यांना आढळले. एकूण १.२७ लाखांपैकी ५४ हजार ६१९ कार्डची पडताळणी झाली. तर सामाजिक-आर्थिक गणनेनुसार मजुरांचे मॅपिंग करायचे आहे. यात ७२ हजार ७२५ जणांचा समावेश आहे. मात्र औंढा ३९४७, सेनगाव-४0५९ यांचे निदान दिसण्यासारखे तरी काम आहे. हिंगोली-४0३, वसमत-५७, कळमनुरी-११ अशी इतरांची परिस्थिती आहे. पुढच्या बैठकीपर्यंत हे काम न संपल्यास थेट कारवाईचा इशारा दिला आहे. जिओ टॅगिंगचीही हीच परिस्थिती आहे. एकूण ६९६३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यापैकी ३५८४ कामांचे टॅगिंग झाले. त्यात सेनगाव-१0५0, औंढा ८५0 यांचा समावेश आहे. २ हजार सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता दिलेले आहे. मात्र ७0३ कामेच सुरू झाली आहेत. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच बीडीओंची चांगलीच झाडाझडती घेतली.

Web Title: Technical officers are free from the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.