तंत्रज्ञानाचा वापर 'लॅब टू लॅण्ड' झाला पाहिजे; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंची अपेक्षा 

By राम शिनगारे | Published: August 11, 2023 07:23 PM2023-08-11T19:23:49+5:302023-08-11T19:24:18+5:30

विद्यापीठात ’ड्रोन तंत्रज्ञानाचे शेतीसाठी उपयोजन’ वर कार्यशाळेस सुरुवात

Technology should be used 'lab to land'; Vice Chancellor Dr. Pramod Yevale Expecting | तंत्रज्ञानाचा वापर 'लॅब टू लॅण्ड' झाला पाहिजे; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंची अपेक्षा 

तंत्रज्ञानाचा वापर 'लॅब टू लॅण्ड' झाला पाहिजे; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंची अपेक्षा 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : विज्ञान-तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे. या क्रांतीमुळे मानवी जीवन सुखकर बनले. शेती, शेतीपुरक उद्योगांमध्ये असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर ’लॅब टू लॅण्ड’ झाला पाहिजे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भुगोल विभागात ’ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर’ या विषयावर शुक्रवारपासून दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. विलासराव देशमुख अध्यासन केंद्र व ग्रामीण समस्या संशोधन केंद्रातर्फे ही कार्यशाळा होत आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर ’ड्रोन’ हवेत उडवून या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरु प्रमोद येवले यांच्या हस्ते झाले. 

यावेळी लातूर येथील कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सचिन शिंदे यांच्यासह कार्यशाळेचे संयोजक डॉ.राम चव्हाण, डॉ.मदनलाल सूर्यवंशी, भुगोल अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.विकास देशमुख, डॉ.सचिन मोरे, डॉ.छत्रभूज भोरे, डॉ.डी.एम.सूर्यवंशी, डॉ.नितीन पाटील, डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ.विश्वास शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी डॉ.सचिन शिंदे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कृषि क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर भविष्य काळात मजुराच्या कमतरतेमुळे वाढणार आहे. शेतीमध्ये फवारणी, पीक निरक्षण, बियाणे लागवड, माती परीक्षण, रोग व किडींचे निरीक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. पुर, दुष्काळ परिस्थितीचे निरिक्षण, शहरांचे थ्री डी मॅपिंग करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा कसा होतो. त्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी, संशोधक, प्राध्यापक व ग्रामीण उद्योजक असे ११० जण कार्यशाहेत सहभागी झाल्याचे डॉ.राम चव्हाण यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ.नामदेव कचरे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.किरण खलंगे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठीडॉ.हनुमंत गुट्टे, डॉ.हेमंत दळवी, डॉ.जगदिश वेताळ, डॉ.भिमराव गायकवाड, डॉ.राजू सुरवसे, दिलीप गायकवाड आदी प्रयत्नशील आहेत. ड्रोन तंत्रज्ञानावरील कार्यशाळाचे शनिवारी कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्या उपस्थितीत समारोप होणार असल्याची माहिती डॉ. राम चव्हाण यांनी दिली.

Web Title: Technology should be used 'lab to land'; Vice Chancellor Dr. Pramod Yevale Expecting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.