तहसील पथकाने केला वाळूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:05 AM2021-05-31T04:05:41+5:302021-05-31T04:05:41+5:30

पैठण : शहरालगत असलेल्या पाटेगाव पुलाच्या परिसरात गोदावरी पात्राच्या काठावर वाळू तस्करांनी केलेला वाळूचा साठा तहसीलच्या पथकाने जप्त केला ...

Tehsil team confiscated sand stocks | तहसील पथकाने केला वाळूचा साठा जप्त

तहसील पथकाने केला वाळूचा साठा जप्त

googlenewsNext

पैठण : शहरालगत असलेल्या पाटेगाव पुलाच्या परिसरात गोदावरी पात्राच्या काठावर वाळू तस्करांनी केलेला वाळूचा साठा तहसीलच्या पथकाने जप्त केला आहे. जप्त केलेला वाळूसाठा उचलून तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान हा वाळूसाठा कुणी केला याचा शोध महसूल यंत्रणा घेत आहे.

तालुक्यात पैठण ते हिरडपुरी दरम्यान वाळूतस्कर सक्रिय झाले. अनेक ठिकाणी यारी व केणीच्या साहाय्याने गोदावरी पात्रातून अवैध वाळूचे उत्खनन करून पात्राच्या काठावर वाळूचा साठा करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून वाळूचोरी होत असल्याने वाळूतस्करांवर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांनी तहसील प्रशासनास दिले आहे. शनिवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संतोष अनर्थे, कमल मनोरे, तलाठी सूरज राजपूत, कोतवाल सतीश दळवे, अनिल घोडके यांच्या पथकाने नवीन कावसान व पाटेगाव येथे छापा मारून गोदावरी पात्राच्या काठावर वाळूतस्करांनी केलेले वाळूसाठे जप्त केले.

३५ ब्रास वाळूसाठा तहसील आवारात

प्रशासनाने जप्त केलेले वाळू साठे रात्रीच्या वेळी पुन्हा तस्कर उचलून नेत असल्याने जप्त केलेले साठे तहसील कार्यालयाच्या आवारात आणून टाकण्याचा निर्णय तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घेतला. कावसान व पाटेगाव येथील जप्त केलेले वाळू साठे ट्रकद्वारे तहसील कार्यालयात आणून टाकण्यात आले. या दरम्यान ३० ते ३५ ब्रास वाळूसाठा तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला.

300521\img_20210530_153853.jpg

जप्त केलेला वाळूसाठ्यातून वाळू तहसील कार्यालयाच्या आवारात आणून टाकली जात आहे.

Web Title: Tehsil team confiscated sand stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.