तेजस ठाकरे युवासेनेच्या प्रमुखपदी ? वरुण सरदेसाई यांनी केले मोठे विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 02:50 PM2021-08-13T14:50:25+5:302021-08-13T14:51:06+5:30

Tejas Thackeray as Yuvasena chief ? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thakarey ) हे लवकरच युवासेना प्रमुखपद सोडतील. भाऊ तेजस ठाकरे यांच्याकडे ते युवासेनेची जबाबदारी सोपवतील अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे.

Tejas Thackeray as Yuvasena chief? Big statement made by Varun Sardesai | तेजस ठाकरे युवासेनेच्या प्रमुखपदी ? वरुण सरदेसाई यांनी केले मोठे विधान

तेजस ठाकरे युवासेनेच्या प्रमुखपदी ? वरुण सरदेसाई यांनी केले मोठे विधान

googlenewsNext
ठळक मुद्देयुवासैनिकांना उमेदवारी देण्याचा निर्णय स्थानिक नेतेच घेणार

औरंगाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( CM Uddhav Thackrey) यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे ( Tejas Thackrey ) हे युवा सेनेची ( Yuva Sena ) कमान सांभाळणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असली तरी युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी यावर मोठे विधान केले आहे. तेजस हे वन्यजीव प्रेमी आहेत. सध्या त्यांची आवड ही वाईल्डलाईफकडेच आहे. सध्या ते राजकारणात येणार नाहीत. त्यांना राजकारणात यायचे असेल तर त्याचा निर्णय ते स्वत: आणि शिवसेनेचे ( Shive Sena ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे घेतील, असे ठाकरे घराण्यांशी जवळीक असलेले सरदेसाई ( Varun Sardesai ) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. ( Big statement made by Varun Sardesai on Tejas Thackeray as Yuvasena chief ? )

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thakarey ) हे लवकरच युवासेना प्रमुखपद सोडतील. भाऊ तेजस ठाकरे यांच्याकडे ते युवासेनेची जबाबदारी सोपवतील अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी तेसज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'सामना'मधून दिलेल्या शुभेच्छांमुळे ते राजकारणात लवकरच प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात आली. यावर युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी औरंगाबादेत प्रतिक्रिया दिली आहे. तेजस हे वन्यजीव प्रेमी आहेत. अनेक वर्ष राज्यातील बहुतांश जंगलात जाऊन त्यांनी विविध प्रजातींचा शोध घेतला आहे. सध्या त्यांची आवड ही वाईल्डलाईफकडेच आहे. त्यांना राजकारणात यायचे असेल तर त्याचा निर्णय ते स्वत: आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे घेतील, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले.

रावसाहेब दानवेंना शुभेच्छा देणार नाही तर कराड मला भेटायला येतील :चंद्रकांत खैरे

युवासैनिकांना तिकिटाचा निर्णय स्थानिक शिवसेना नेते घेतील 
युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी वरुण सरदेसाई सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, या संपूर्ण दौऱ्यातून संघटन मोठे करण्याचा प्रयत्न आहे. युवा सेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी चांगले काम करीत असेल तर स्थानिक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उमेदवारीची संधी देतील. तिकिट वाटप, निवडणुकांचे निर्णय शिवसेनेचे नेते घेत असतात. त्यांचा निर्णय युवासैनिकांना मान्य असेल. युवासेनेसाठी वेगळा विशेष कोटा निवडणुकीत असावा, असा विषय नाही. जो चांगले काम करीत ते पुढे येईल. असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी अमेल घोले, आदित्य शिरोडकर, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल, किरण तुपे, मिथून व्यास आदींची उपस्थिती होती.

Web Title: Tejas Thackeray as Yuvasena chief? Big statement made by Varun Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.