महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 08:39 PM2023-04-24T20:39:13+5:302023-04-24T20:45:00+5:30

भारताला परिवर्तनाची गरज; भारत बदलला तरच विकास होईल.

Telangana KCR, So many rivers in Maharashtra, government cannot provide drinking water; KCR's slams | महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात

महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: दाआज तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएसचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांनी शहरात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी देशातील पाण्याची समस्या आणि शेतकरी प्रश्नावरुन आपले व्हिजन मांडले. यावेळी त्यांनी देशाला परिवर्तनाची गरज असल्याचे म्हटले. तसेच, शेतकऱ्यांना पक्षासोबत येण्याचे आवाहनही केले.

यावेळी ते म्हणाले, आपला भारत देश खूप महान आहे, पण आज आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय. आज आपल्या देशाचे लक्ष्य काय आहे? की भारत आपले लक्ष्य हरवून बसलाय? लक्ष्य नसेल तर हा देश कुठे जाणार? देशात काय सुरू आहे? नव्या जिद्दीने पुढे जायचे आहे की, असेच पडून राहायचे आहे? भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. मला माहिती मिळाली की, संभाजीनगर शहरात आठ दिवसातून एकदा पाणी येते. माझ्यासोबत अकोल्यातील सहकारी आहे, तिकडेही अशीच अवस्था आहे. महाराष्ट्रात इतक्या नद्या आहेत, पण आजही पाण्याची भीषण परिस्थिती आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असलेल्या राज्यात पिण्याचे पाणी देऊ शकत नाही? 

ते पुढे म्हणतात, जनता सोन्याची वीट, चंद्र-तारे मागत नाहीत, फक्त पिण्याचे पाणी मागत आहेत. इतकी सरकारं बदलली, इतका गोंधळ झाला, पण पिण्याचे पाणी देऊ शकत नाही. आज बेरोजगारी वाढत आहे. लाखो उद्योग बंद होत आहेत. कामगार रस्त्यावर आले आहेत. देशात जातीवाद-धर्मवाद-लिंगभेद सुरू आहे. दररोज अशाच घटना आपण पाहत आहोत. श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत. गरीब अजून गरीब होत आहे. हे कडू सत्य आहे. आपल्या डोळ्यांसमोर हे घडत आहे. हे असचं चालू द्यायचे आहे की, याचा काही तोडगा काढायचा आहे? 

आता परिवर्तनाची गरज आहे. भारताला बदलाची गरज आहे. जोपर्यंत आपण परिवर्तन करणार नाही, तोपर्यंत आपले नशीब बदलणार नाही. या देशात एक पक्ष गेला दुसरा आला, पक्ष बदलला म्हणजे बदल झाला नाही. या महाराष्ट्रात रोज 6-7 शेतकरी आत्महत्या करतात. पण, आपले पंतप्रधान आफ्रिकेतून चित्ते आणतात आणि दाखवतात. याला काय अर्थ आहे? मी शेतकऱ्यांना विनंती करतो की, भारताला बदलायचे असेल तर तुमची साथ लागेल. बदलाशिवाय भारताचा विकास होणार नाही. आपली समस्या आपल्यालाच सोडवावी लागेल. कुणी अमेरिका-रशियातून येणार नाही. लवकर जागे झालो, तरच आपला सुधार होईल, असेही केसीआर यावेळी म्हणाले.

आपल्या भारतात 41 लाख हेक्टर कृषी क्षेत्र आहे. या शेतीला जितके पाणी लागते, त्यापेक्षा डबल पाणी उपलब्ध आहे. पण, आपल्या देशातील नेत्यांची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. याला बदलावे लागेल. नेहरुंच्या काळात काही योजना व्हायच्या. पण, त्यानंतर जेवढी सरकारे आली, त्यांनी काहीच कामे केली नाही. देशात जे पाणी आहे, ते समुद्रात वाहून जात आहे. सरकार तमाशा पाहत आहे. पाण्यासाठी चांगली धरणे बांधायला हवी, वाहत्या पाण्याला थांबवावे लागेल. पाणी असूनही त्याचा योग्य वापर होत नाही. पाण्याची पॉलिसी बदलावी लागेल, त्याशिवाय आपण तहाणलेले राहू. 

पाणी कोणत्या कंपनीत बनवू शकत नाही. पाणी देवाची देणं आहे. याचा योग्य वापर व्हायला हवा. याचा वापर अनेक देशांनी योग्यरित्या केला आहे. पण, आपल्या देशात पाण्याचा योग्य वापर होत नाही. पाण्याची पॉलिसी बदलायला हवी. महाराष्ट्रात बीआरएस सरकार बनवा, प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचवू. आज तेलंगणात दररोज पाणी मिळत आहे. श्रीमंत लोक जे पाणी पितात, तेच गरीबांनाही आम्ही देतो. आमचे सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देऊ, हे माझे वचन आहे. पाण्यासाठी रडायचे नाही, लढायचे. शेतकऱ्यांना एकत्र या आणि सोबत येऊन परिस्थिती बदलुया. आपल्यालाच आपली मदत करावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. 

Web Title: Telangana KCR, So many rivers in Maharashtra, government cannot provide drinking water; KCR's slams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.