मेल्ट्रॉन येथे टेली आयसीयू रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:05 AM2021-01-20T04:05:12+5:302021-01-20T04:05:12+5:30

मनपाने वसूल केला ४४, ८०० रुपये दंड औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने मंगळवारी शहरात नागरिकांकडून ४४ हजार ८०० ...

Tele ICU ambulance service at Meltron | मेल्ट्रॉन येथे टेली आयसीयू रुग्णसेवा

मेल्ट्रॉन येथे टेली आयसीयू रुग्णसेवा

googlenewsNext

मनपाने वसूल केला ४४, ८०० रुपये दंड

औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने मंगळवारी शहरात नागरिकांकडून ४४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. २१ हजार रुपये मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला. कॅरिबॅगचा वापर केल्याबद्दल काही व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला.

होर्डिंग, बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई

औरंगाबाद : अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्ज लावणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना दोन हजार रुपये दंड भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात येत आहे.

रेल्वेस्टेशनवर दोन प्रवासी पॉझिटिव्ह

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य पथकाने मंगळवारी रेल्वे स्टेशनवर दिल्लीहून आलेल्या २०६ नागरिकांची कोरोना तपासणी केली. सोमवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती त्यातील दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले. विमानतळावर मंगळवारी ८९ प्रवाशांची तपासणी केली.

Web Title: Tele ICU ambulance service at Meltron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.