खरं काय ते सांगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:10 AM2018-05-04T00:10:26+5:302018-05-04T00:11:27+5:30

शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले.

Tell me what the truth is ... | खरं काय ते सांगा...

खरं काय ते सांगा...

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधान सचिव : कचराकोंडीविषयी औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले. १६ फेबु्रवारीपासून शहरातील कचरा समस्येवर आजपर्यंत सचिव पातळीवर पाच बैठका झाल्या असून, कालबद्ध कार्यक्रम पालिकेला तयार करता आलेला नाही.
नगरविकास खात्याचे प्रधान सचिव करीर यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तालयात तासभर कच-याच्या समस्येबाबत पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. शिवाय यंत्रणेची उलटतपासणीदेखील केली. त्यांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मनपा प्रशासनाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात करण्याचा शब्द घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रधान सचिवांना दिला. ७६ दिवसांपासून कचºयाची समस्या धुमसत असून, १४८ दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम नारेगाव-मांडकीतील आंदोलन सुरू असताना मनपाने सादर केला होता.
रस्त्यांवर कचरा दिसत नसला तरी ओला-सुका असे वर्गीकरण होत नाही. रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करा. सरकारी कार्यालयात डस्टबिन ठेवा. फळ विक्रेते, टपरीधारकांना डस्टबिन ठेवण्याची सक्ती करा. कचरा प्रक्र्रियेत अडथळा निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत पुढे आल्या.
बैठकीस विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपसंचालक रिता मेत्रेवार, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदी अधिकारी उपस्थित होते.
प्रधान सचिवांनी केलेल्या सूचना
आठ दिवसांत वॉर्ड अधिकारी, कचरा वेचकांच्या माध्यमातून मनपाने घरोघरी जावे. ओला कचरा दरदिवशी गोळा करण्यात येईल. मात्र सुका कचरा आठवड्यातील ठराविक दिवशीच गोळा करण्यात येईल, याची सूचना नागरिकांना द्यावी. खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, रसवंती, व्यावसायिक व इतर विक्रेत्यांना ओला, सुका कचरा स्वतंत्ररीत्या संकलित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कचरापेट्या ठेवणे बंधनकारक करावे.
पावसाळ्याच्या आधी सर्व नाल्यांजवळ साचलेल्या कचºयाची विल्हेवाट लावावी. उघड्यावर कचरा फेकणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
१०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया गृहनिर्माण संस्था, व्यापारी, खाजगी, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसायिक यांच्यामार्फ त कचºयाची योग्य शास्त्रीय विल्हेवाट लावल्या जात नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

Web Title: Tell me what the truth is ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.