मराठवाडा गारठला; औरंगाबाद, परभणी, नांदेडचे तापमान १५ डिग्रीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:25 PM2019-11-27T13:25:05+5:302019-11-27T13:28:28+5:30
डिसेंबरच्या साधारण पहिल्या दिवसापासून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे़
पुणे : राज्यात हळुहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १२़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ तर मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी आणि नांदेडचे तापमान १५ अंश सेल्सिअस इतके खाली घसरले आहे.
दक्षिणेत ईशान्य मान्सून सध्या सक्रिय आहे़ तामिळनाडू, पाँडेचरी राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे़ यामुळे मध्य भारतात अनेक ठिकाणी सध्या किमान तापमान हे सरासरीपेक्षा किंचित अधिक दिसून येत आहे़ कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीएवढे आहे़ पुढील दोन दिवसात राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर डिसेंबरच्या साधारण पहिल्या दिवसापासून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे़
प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे १४़१, अहमदनगर १२़५, जळगाव ३०़४, महाबळेश्वर १५, मालेगाव १६़६, नाशिक १५़८, सांगली १८़१, सातारा १५़३, सोलापूर १९़५, मुंबई २३, सांताक्रुझ २०़५, अलिबाग २१़२, रत्नागिरी २०़९, पणजी २३़५, डहाणू २२़४, औरंगाबाद १५़१, परभणी १५, नांदेड १५, बीड १६़८, अकोला १५़८़