टेम्पोची धडक; दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 04:27 PM2020-09-28T16:27:01+5:302020-09-28T16:28:11+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील वडोद बाजार फाट्याजवळ टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत  दुचाकीचालक ठार झाला.  ही घटना  रविवारी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान घडली असून एकनाथ आनंदा महाजन (४५ वर्षे) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात  वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भराडी येथील एकनाथ महाजन औरंगाबादहून सिल्लोडकडे जात असता सिल्लोडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पो (एमएच १२, एफसी ७७४३) ने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात महाजन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. या  अपघाताची माहिती मिळताच वडोदबाजार  पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मालोदे, वाकेकर, निकम, गायकवाड घटनास्थळी  दाखल झाले. महाजन यांना रूग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी  फुलंब्री उपजिल्हा रूग्णालयात हलविले. तेथे ...

Tempo beat; Two-wheeler killed | टेम्पोची धडक; दुचाकीस्वार ठार

टेम्पोची धडक; दुचाकीस्वार ठार

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद सिल्लोड महामार्गावरील वडोद बाजार फाट्याजवळ टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत  दुचाकीचालक ठार झाला.  ही घटना  रविवारी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान घडली असून एकनाथ आनंदा महाजन (४५ वर्षे) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात  वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भराडी येथील एकनाथ महाजन औरंगाबादहून सिल्लोडकडे जात असता सिल्लोडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पो (एमएच १२, एफसी ७७४३) ने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात महाजन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. या अपघाताची माहिती मिळताच वडोदबाजार  पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मालोदे, वाकेकर, निकम, गायकवाड घटनास्थळी  दाखल झाले. महाजन यांना रूग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी  फुलंब्री उपजिल्हा रूग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अपघातातील वाहन वडोदबाजार पोलीस ठाण्यात जमा  करण्यात आले असून सपोनि संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी निकम पुढील तपास करत आहेत. 

तासभर मदत मिळाली नाही

अपघात घडल्यावर परिसरातील नागरिक धावत आले. त्यांनी १०८ रूग्णवाहिकेला फोन केला. मात्र ती उपलब्ध होऊ शकली नाही.  फुलंब्री येथून  रूग्णवाहिका येईपर्यंत जवळपास तासभर जखमी महाजन रस्त्यावर पडून होते. वेळेवर उपचार मिळाले असते, तर जीव वाचला असता, अशी शक्यता  प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. 

Web Title: Tempo beat; Two-wheeler killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.