खड्डे बुजविण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या योजनेतून रोडवर साचला खडीचा थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:04 AM2021-07-20T04:04:31+5:302021-07-20T04:04:31+5:30
लोेकमतमधील वृत्ताची दखल घेत माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांनी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा टोलवसुली बंद पाडू ...
लोेकमतमधील वृत्ताची दखल घेत माजी विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांनी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा टोलवसुली बंद पाडू असा, इशारा दिला होता. दरम्यान, जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळपासून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. मात्र रस्त्यावर डांबराचे प्रमाण कमी आणि खडी जास्त असा प्रकार झाल्याने रस्त्यावर धुरळा उडत आहे.
चौकट
करमाड बसस्थानक आणि दर्ग्यासमोर खड्डेच खड्डे
करमाड बसस्थानक आणि दर्ग्यासमोर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. याही वर्षी पडलेल्या या जीवघेण्या खड्ड्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. रस्त्यावर खड्ड्यामुळे झालेल्या चाळणीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
फोटो - करमाड बसस्टँडवर पडलेल्या खड्डे बुजविण्यासाठी खडीमिश्रित डांबर टाकल्याने रस्त्यावर असा खडीचा थर साचला आहे. या खडीवरून जाताना दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला.