निवडणुकीत मराठवाड्यातून लढणार होते दहा उमेदवार; ‘चॉकलेट हीरो’ने काढला होता राजकीय पक्ष पण...
By प्रभुदास पाटोळे | Published: April 18, 2024 06:51 AM2024-04-18T06:51:55+5:302024-04-18T06:51:59+5:30
देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी.
प्रभुदास पाटोळे, लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू केली नसती, तर ‘चॉकलेट हीरो’ देवानंद यांनी स्थापन केलेल्या ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षातर्फे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एम.सी. छागला, माजी राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित आणि अभिनेत्री हेमा मालिनीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वरिष्ठ वकील सुखदेवराव शेळके यांच्यासह मराठवाड्यातील दहा उमेदवार निवडणूक लढले असते.
पक्षात सेवानिवृत्त न्यायमूर्ती अन् डॉक्टरही...
- देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी. परंतु त्यांची कर्मभूमी मुंबई. त्यांनाही राजकारणाने माेहित केले हाेते. म्हणूनच त्यांनी स्वतःचा ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा पक्ष काढला हाेता. या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते.
- त्यांच्या कार्यकारिणीत राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज नेते, समाजधुरीण, न्यायदान क्षेत्रातील सेवानिवृत्त उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, वकील, डाॅक्टर व सिने कलाकार होते.
...आणि पक्ष गुंडाळला !
- - देवानंद यांनी मुंबईतील हॉटेल ‘सन ॲन्ड सॅन्ड’ मधील पक्षाच्या बैठकीत शरद गव्हाणे यांची मराठवाडा पक्ष प्रमुख म्हणून आणि ॲड. सुखदेवराव शेळके यांची औरंगाबाद जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. शेळके यांच्या ‘बाणगंगेच्या तिरी’ या आत्मकथनपर पुस्तकात हा किस्सा आहे.
- - निवडणूक खर्चासाठी म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे अभिवचनही देवानंद यांनी दिल्याचे शेळके यांनी नमूद केले आहे.
- - येथील मंडळी परत औरंगाबादला आल्यानंतर ८-१० दिवसांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली.
- - परिणामी देवानंद यांना त्यांचा पक्ष गुंडाळावा लागला.