दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:05 AM2021-04-18T04:05:01+5:302021-04-18T04:05:01+5:30
सिल्लोड : राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी ...
सिल्लोड : राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदभरतीबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार १२७ पदे तातडीने तातडीने भरण्याची मागणी केली आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सरकारतर्फे त्याला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त मंत्रालयाकडे एक प्रस्ताव सादर केला. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची १०, १२७ पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने दहा हजार १२७ पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यालयाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल. - अब्दुल सत्तार, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री.