शहर बससेवेची निविदा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 12:18 AM2017-03-11T00:18:50+5:302017-03-11T00:20:45+5:30
लातूर : मनपाची शहर बस सेवा निविदेअभावी रखडली होती. अखेर परिवहन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत शहर बस सेवेची निविदा मंजूर करण्यात आली.
लातूर : मनपाची शहर बस सेवा निविदेअभावी रखडली होती. अखेर परिवहन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत शहर बस सेवेची निविदा मंजूर करण्यात आली. सर्वात कमी दराच्या निविदेला करार पद्धतीने मंजुरी देण्यात आली.
परिवहन समितीचे सभापती पंडित कावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनपाच्या तीन बसेस आणि ठेकेदाराच्या बस सेवेच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. २.५ रुपये प्रति कि.मी. दराने मंजुरी देण्यात आली तर कंत्राटदाराच्या बसेससाठी १.८५ प्रति कि.मी. दराने मंजुरी देण्यात आली. बैठकीला समितीचे सदस्य विक्रांत गोजमगुंडे, कल्पना भोसले, दीपिका बनसोडे, सुधाकर साळुंके, अनुप मलवाड, रेणुका कडणे, खैरुन्निसा पठाण, शारदा बनसोडे, त्रिंबक स्वामी, राजेंद्र इंद्राळे, अंजली चिंताले आदींची उपस्थिती होती. निविदेतील दर आणि वाटाघाटीतील दरावर चर्चा करण्यात आली.