Aurangabad Violence : धुमश्चक्रीनंतर औरंगाबाद शहरात तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:12 AM2018-05-13T01:12:37+5:302018-05-14T10:43:07+5:30

शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुंवारफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार, याविषयाचा निर्णय उद्या, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. तसेच दंगलीतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tense calm in Aurangabad city after the demolition | Aurangabad Violence : धुमश्चक्रीनंतर औरंगाबाद शहरात तणावपूर्ण शांतता

Aurangabad Violence : धुमश्चक्रीनंतर औरंगाबाद शहरात तणावपूर्ण शांतता

googlenewsNext
ठळक मुद्देमंत्री, नेते, अधिकारी शहरात : सोशल मीडियाने दंगल भडकवलीदंगलीची होणार उच्चस्तरीय चौकशी -गृहराज्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुंवारफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार, याविषयाचा निर्णय उद्या, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. तसेच दंगलीतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रणजित पाटील म्हणाले, एकाच वेळी चार-पाच ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडत होत्या. यामुळे पोलिसांना सर्वच ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. यात सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे दंगल भडकण्यास हातभार लागला असून, सायबर सेलला याविषयी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दंगलीच्या सखोल चौकशीसाठी राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. या चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
कोणतीही दंगल असो ती वाईटच असते. त्यात जात-धर्माचा संबंध येत नाही. ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेऊन चौकशी केली जाईल. तसेच शिवसेना आणि एमआयएम पक्षीय वादातून ही दंगल झालेली नसल्याचा दावाही रणजित पाटील यांनी केला.


चौकशीचा कालावधी नाही
उच्चस्तरीय चौकशी किती दिवसांत होणार? असा प्रश्न गृहराज्यमंत्र्यांना विचारला असता त्यांनी याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगितले. तसेच मिटमिटा परिसरात झालेल्या दंगलीची चौकशी सुरू झालेली नाही याकडे लक्ष वेधताच त्यांनी त्या दंगलीचा आणि या दंगलीचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.


जखमी, नुकसानीविषयी मंत्री अनभिज्ञ
दंगलीमध्ये नुकसान किती झाले? पोलीस अधिकारी, पोलीस आणि नागरिक किती जखमी झाले? याविषयीची आकडेवारी गृहराज्यमंत्री पाटील यांना विचारली असता, त्यांना ठोस आकडा सांगता आला नाही. आपल्या विभागातील किती पोलीस जखमी झाले, याचीही माहिती पाटील यांना देता आली नाही. दोन अधिकारी आणि तीन पोलीस जखमी झाल्याचे समजले, असे उत्तर दिले. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच सर्व माहिती समोर येईल, असे सांगत वेळ मारून नेली.

...अन् पालकमंत्र्यांचा पारा चढला
शहरात पोलीस आयुक्त नाहीत, महापालिका आयुक्त नाही. यातच पाणी प्रश्न, कचºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालकमंत्री असून नसल्यासारखेच आहेत, असा प्रश्न पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना विचारला असता त्यांचा पारा एकदम चढला. पालकमंत्री असून नसल्यासारखे म्हणजे काय? पालकमंत्र्यांनी अशा घटना घडल्या त्यात काय करावे? शहरात दररोजच कच-याची निर्मिती होते.
त्यामुळे ती समस्या सोडविण्यासाठी थोडासा अवधी लागणार आहे. त्याविषयीचे नियोजन केले असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. घडलेली घटना दुर्दैवी आहे. समाजात सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणूनच शहरात आलो आहे. कोणत्याही समाजाला दंगली परवडत नसतात. दोन्ही बाजूकडील नागरिकांना शांतता, अमन हवी आहे. ती स्थापित होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

Web Title: Tense calm in Aurangabad city after the demolition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.