जाचक अटींमुळे शिक्षकांमध्ये तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:15 AM2017-12-31T00:15:32+5:302017-12-31T00:15:35+5:30

सलग १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून, चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) उत्तीर्ण असावी, ही अट लागू केल्यामुळे शिक्षकांच्या असंतोषाचा पारा चढला. तथापि, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, या मागणीसाठी शनिवारी ३०० शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

 Tensioned atmosphere among teachers due to eloquent conditions | जाचक अटींमुळे शिक्षकांमध्ये तणावाचे वातावरण

जाचक अटींमुळे शिक्षकांमध्ये तणावाचे वातावरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सलग १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली असून, चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) उत्तीर्ण असावी, ही अट लागू केल्यामुळे शिक्षकांच्या असंतोषाचा पारा चढला. तथापि, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, या मागणीसाठी शनिवारी ३०० शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांना सातत्याने निवेदने देण्यात आली. मात्र, चटोपाध्याय वेतनश्रेणीची प्रकरणे निकाली काढली जात नाहीत. राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी पात्र शिक्षकांना सदरील वेतनश्रेणी मान्य केली आहे; परंतु औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून गरज नसतानाही जातवैधता व संगणक परीक्षा (एमएससीआयटी) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत.
महिनाभरापूर्वी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते.
शनिवारी दुपारी आंदोलनकर्ते शिक्षकांची भेट घेण्यासाठी शिक्षण सभापती मीनाताई शेळके, जि.प. सदस्या पुष्पाताई काळे व शिक्षणाधिकारी लाठकर या आंदोलन मंडपात आल्या. तेव्हाही शिक्षणाधिकारी लाठकर यांनी आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिक्षणाधिकारी लाठकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षकांना जातवैधता प्रमाणपत्र व संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची अट पूर्ण करावी लागेल, असे सांगितले.
त्यानंतर सदरील संतप्त शिक्षकांनी जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांची भेट घेऊन प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचे सांगितले.
आंदोलनात कृती समितीचे किरण पाटील, नितीन पाटील, रमेश नप्ते, अनिल जगदाळे, रतन पवार, ईश्वर पावरा, प्रकाश दाणे, महेंद्र बारवाल, संतोष ताठे, दिलीप ढाकणे, विजय साळकर, प्रभाकर पवार, सदानंद माडेवार, मच्छिंद्र भराडे, गोविंद उगले, कैलास गायकवाड आदींसह विविध संघटनांचे जवळपास ३०० शिक्षक सहभागी झाले होते.
शेवटी धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नितीन पाटील यांनी मानले.
अन्यथा साखळी उपोषण करणार
च्यासंदर्भात कृती समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले की, प्रशासनाने शिक्षकांच्या संयमाचा अधिक अंत पाहू नये. येत्या आठ दिवसांत चटोपाध्याय वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर नवव्या दिवसांपासून जि.प. मुख्यालयासमोर कृती समितीच्या वतीने शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू केले जाईल.

Web Title:  Tensioned atmosphere among teachers due to eloquent conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.