भयंकर! पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकास अॅसिड टाकून जाळले, दुसऱ्यावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:42 PM2024-10-02T13:42:15+5:302024-10-02T13:42:47+5:30

खुलताबाद पोलीसांनी तीन आरोपींना केली अटक; रात्री छत्रपती संभाजीनगर रोडवरील घटना

Terrible! One was burnt with acid over money exchange, another was stabbed with a knife | भयंकर! पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकास अॅसिड टाकून जाळले, दुसऱ्यावर कोयत्याने वार

भयंकर! पैशाच्या देवाणघेवाणीवरून एकास अॅसिड टाकून जाळले, दुसऱ्यावर कोयत्याने वार

खुलताबाद: पैशाच्या देवाणघेवाणीवरून तीन जणांनी दोन जणांवर हल्ला केला चाकू व कोयत्याने हल्ला करीत एका जणास अॅसिड टाकून जाळून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर अन्य एका जखमीवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. खुलताबाद पोलीसांनी रात्रीच तिन्ही आरोपींना अटक करून गजाआड केले आहे. रात्री साडेअकरा वाजता ही घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नंद्राबादनजीक घडली. 

याबाबत या हल्ल्यातील जखमी असलेला आनंद बाबासाहेब वारे ( रा. फुलेनगर, उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अक्की उर्फ आकाश कैलास रणधीर ( ३६, रा वेरूळ ता खुलताबाद,  हमु सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर) हा मंगळवारी सायंकाळी वेरूळला जायच म्हणून मोटारसायलवर आला. त्याच्यासोबत वेरूळला मयूर पाटणी याच्या लॉजवर गेलो. मात्र, मयूर पाटणी याने नंद्राबादनजीक असलेल्या परमीट बारवर येण्यास सांगितले. ठेतहे त्याच्यासोबत नितीन ठाकरे देखील होता. येथे सर्वांनी दारू पिली. तेवढ्यात  रात्री ११:३० वाजता शेख नावेद त्या ठिकाणी आला. त्यानंतर मयूर पाटणीने आकाशला ७ हजार रूपये देण्यासाठी बाहेर काढले. मात्र, आकाशने आणखी १० ते १२ हजार रूपये जास्तीचे मागत पैसे घेण्यास नकार दिला. त्यावर मयूर पाटणी याने आकाश रणधीर व आनंद वारे यास हॉटेलच्या पाठीमागे घेवून गेले. अचानक मयूरने आनंद वारे याचे तोंड दाबून पाठीवर, पोटावर वार केले. त्यानंतर शेख नावेदने चाकूने आकाशच्या पोटावर व डोक्यावर वार केले. 

दरम्यान, हल्ला होत असताना मयूर पाटणीच्या हातातून कोयता हिसकावून जखमी अवस्थेत आनंद वारे तेथून फरार झाला. मित्राच्या मदतीने आनंद छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल झाला. त्याच वेळी आकाश रणधीर यास ही उपचारासाठी रूग्णवाहिकेतून आणले होते. आकाश रणधीर याच्या अंगावर ,तोंडावर ,डोळ्यावर अँसिड टाकले असल्याने तो संपूर्ण जळाला होता. येथे उपचार सुरू असताना आकाशचा मृत्यू झाला. 

माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सपोनि दिनकर गोरे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. तसेच तत्काळ मयूर पाटणी, नितीन ठाकरे , शेख नावेद ( सर्व रा वेरूळ ता. खुलताबाद) यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहे. दरम्यान, आकाश रणधीर हा वेरूळ गावातील काही व्यापाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून खंडणीसाठी त्रास देत असल्याची गावात चर्चा आहे. सततच्या त्रासाला कंटाळूनच आरोपींनी हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: Terrible! One was burnt with acid over money exchange, another was stabbed with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.