टीईटी पुन्हा लांबणीवर ? आता युजीसी-नेट व टीईटी परीक्षा एकाच दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 06:01 PM2021-10-27T18:01:05+5:302021-10-27T18:01:53+5:30
नेट परीक्षाही विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
औरंगाबाद : वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा आणि यूजीसीच्यावतीने घेण्यात येणारी प्राध्यापक पात्रता परीक्षा २१ नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. त्यामुळे, टीइटी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
आराेग्य विभागाच्या परीक्षांमुळे परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा ३० ऑक्टाेबर राेजी हाेणार हाेती. मात्र, देगलूर-बिलाेली विधानसभा मतदारसंघाची पाेटनिवडणूक हाेत असल्याने शिक्षक पात्रता परीक्षा २१ नाेव्हेंबर राेजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. केंद्रीय अनुदान आयाेगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या प्राध्यापक पात्रता परीक्षेच्या तारखांची घाेषणा करण्यात आली आहे.
नेट परीक्षाही विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये हाेणारी परीक्षा आता २० ते ३० नाेव्हेंबरदरम्यान हाेणार आहे. २१ नाेव्हेंबर राेजी नेट आणि टीईटी परीक्षा हाेणार असल्याने विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देता येणार आहे.