TET Scam मध्ये मुलांसह शिक्षणसंस्थेतील व्यक्तींची नावे असल्याने सत्तारांचे मंत्रीपद काढा

By बापू सोळुंके | Published: August 30, 2022 12:59 PM2022-08-30T12:59:13+5:302022-08-30T13:00:09+5:30

टीईटी घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांसह शिक्षण संस्थेतील अनेकांची नावे

TET Scam Names of teachers from education institute including children of Minister Abdul Sattar; Remove minister post till investigation: Ambadas Danve | TET Scam मध्ये मुलांसह शिक्षणसंस्थेतील व्यक्तींची नावे असल्याने सत्तारांचे मंत्रीपद काढा

TET Scam मध्ये मुलांसह शिक्षणसंस्थेतील व्यक्तींची नावे असल्याने सत्तारांचे मंत्रीपद काढा

googlenewsNext

औरंगाबाद: टीईटी घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलासह संस्थेतील अनेकांची नावे आहेत. यामुळे या प्रकरणाची  निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना मंत्रीपदावरून दूर ठेवावे, अशी मागणी विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. 

दानवे म्हणाले, राज्यातील एका मुख्यमंत्र्यांने मुलीच्या परीक्षेतील गुणवाढ प्रकरणावरून राजीनामा दिला होता. आता तर राज्यातील कॅबिनेटमंत्री यांच्या मुलीचे नाव टीईटी घोटाळ्यात आले आहे. विशेष म्हणजे, सत्तरांच्या यांच्या शिक्षण संस्थेतील अनेक शिक्षकांची नावे देखील या घोटाळ्यात आली आहेत. घोटाळ्यात त्यांच्या मुलींची नावे समोर आल्यानंतर सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी उपसंचालक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धमकावले होते. यामुळे सत्तार यांचा या घोटाळ्यात समावेश आहे अथवा नाही हे चौकशी नंतर समोर येईल. मात्र तोपर्यंत त्यांना मंत्रीपदावरून बाजूला करा. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी ही दानवे यांनी केली.

 

Web Title: TET Scam Names of teachers from education institute including children of Minister Abdul Sattar; Remove minister post till investigation: Ambadas Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.