आॅनलाइनकडे मंडळांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:27 AM2017-08-25T00:27:46+5:302017-08-25T00:27:46+5:30
जनजागृतीचा अभाव व आनलाइन नोंदणी करताना येणाºया अडचणींमुळे आॅनलाइन नोंदणीस गणेश मंडळांचा अल्पप्रतिसाद मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रत्येक गणेश मंडळास यंदा आॅनलाइन नोंदणी परवाना घ्यावा लागणार आहे. मात्र, जनजागृतीचा अभाव व आनलाइन नोंदणी करताना येणाºया अडचणींमुळे आॅनलाइन नोंदणीस गणेश मंडळांचा अल्पप्रतिसाद मिळत आहे.
गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्त विभागाच्या (चॅरिटी डॉट महाराष्ट्रा डॉट जीओव्ही डॉट इन ) या वेबसाईटवर आॅनलाइन नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आॅनलाईन नोंदणीचा फार्म भरताना गणेश मंडळांना आधार, पॅनकार्ड, ईमेल आॅयडी व मोबाईल नंबर आदी माहिती देणे बंधनकारक आहे. आॅनलाइन उपलब्ध फार्म पूर्णपणे भरल्यानंतर मंडळांना तीन ते चार दिवसात दिलेल्या ई-मेल आयडीवर प्रमाणपत्र पाठविण्यात येते. तसा संदेशही वेबसाईटवर नोंदणी केलेल्या मोबाईलवर प्राप्त होतो. मात्र, बहुतांश गणेश मंडळांच्या सदस्यांना आॅनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेबाबत माहिती नाही.
शिवाय आॅनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने गणेश मंडळांच्या सदस्यांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. विशेषत: तालुका व ग्रामीण भागातील मंडळांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या सदस्यांचे आॅफलाइन नोंदणीस पसंती देत आहे. मात्र, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आॅनलाइन नोंदणीचा आग्रह धरण्यात येत असल्याने अनेक गणेश मंडळांची धावपळ होत आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आॅनलाइन नोंदणीचे काम सुरू होते. तसेच अनेक मंडळांच्या सदस्यांनी येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातही गर्दी केल्याचे दिसून आले.
गुरुवारी जिल्हाभरातून सुमारे दोनशे मंडळांनी आॅनलाइन नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.