शिवतीर्थावर ठाकरे तोफ धडाडणार; उच्च न्यायालयाची विरोधकांना चपराक: अंबादास दानवे
By बापू सोळुंके | Published: September 23, 2022 05:55 PM2022-09-23T17:55:04+5:302022-09-23T18:00:24+5:30
विधान परिषद विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांची विरोधकांवर टीका
औरंगाबाद: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ नये यासाठी शिंदे गट शिवसेनेने आडकाठी आणली होती. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. आज या प्रकरणावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने शिवाजी पार्कवर शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. या निकालावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी नमूद केले की, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास माननीय न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना परवानगी दिली. न्यायदेवतेचा आभार आम्ही मानतो. न्यायालयाच्या या निकालाने विरोधकांना चपराक बसली आहे.
मुंबईतीळ शिवाजी पार्क येथे अनेक वर्षांपासून शिवसेनेचा दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केल्या जाते. यावर्षी ही शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावे यासाठी अर्ज केला होता. यांनंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज करून आम्हाला हे मैदान द्यावे, अशी मागणी केली होती. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. याविषयी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यापार्श्वभूमीवर आजच्या निकालामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे.