धामोरी-शिवपूर कोल्हापुरी बंधा-याचे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 06:30 PM2018-11-18T18:30:16+5:302018-11-18T18:30:53+5:30

वाळूज महानगर : धामोरी-शिवपूर कोल्हापुरी बंधाºयाच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यात न आल्योन हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे शेंदूरवादा परिसरातील शेतकºयांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या बंधाºयाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा, या मागणीसाठी शेतकºयांनी मंगळवारी मुंबईतील जलसंधारण विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

  Thamori-Shivpura Kolhapuri dam pending | धामोरी-शिवपूर कोल्हापुरी बंधा-याचे रखडले

धामोरी-शिवपूर कोल्हापुरी बंधा-याचे रखडले

googlenewsNext

आंदोलनाचा इशारा : प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यात विभागाची अनास्था
वाळूज महानगर : धामोरी-शिवपूर कोल्हापुरी बंधाºयाच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्यात न आल्योन हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे शेंदूरवादा परिसरातील शेतकºयांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या बंधाºयाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा, या मागणीसाठी शेतकºयांनी मंगळवारी मुंबईतील जलसंधारण विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


वाळूज व शेंदूरवादा परिसरातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पात अनेक वर्षांपासून अपेक्षित जलसाठा होत नसल्यामुळे या भागातील बागायतीचे क्षेत्र घटत आहे. या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी धामोरी-शिवपूर परिसरात कोल्हापुरी बंधारा उभारण्यात यावा, यासाठी आ. प्रशांत बंब, जि. प. सदस्या छाया अग्रवाल, शिवप्रसाद अग्रवाल व परिसरातील शेतकºयांनी यांनी जलसंधारण विभाग व शासनाकडे पाठपुरावा केला आहे. जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी व कर्मचाºयांनी या बंधाºयासाठी मोजमाप करुन बंधाºयांचे अंदाजपत्रक तयार प्रशासकीय मान्यतेसाठी मुंबई कार्यालयाकडे सादर केले होते.

यात १९ विविध प्रकारच्या त्रुटी असून,त्याची पूर्तता करुन तात्काळ नव्याने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश २४ मार्चला सचिवस्तरावरुन देण्यात आले होते. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटुनही त्रुटी दूर करण्यात न केल्यामुळे या बंधाºयाचे काम रखडले आहे.शेतकºयांनी महिनभरापूर्वी १० सप्टेंबरला जलसंधारण विभागातील अधिकाºयांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. या इशाºयामुळे प्रादेशिक अधिकारी आर.बी.नाथ यांनी चार दिवसांत नवीन अंदाजपत्रक व त्रुटीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले होते.


जलसंधारण विभागाच्या अधिकाºयांनी आंदोलनकर्त्या शेतकºयांना आश्वासन देऊन महिना उलटला आहे. तरी अद्यापर्यंत त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे या बंधाºयाचे काम रखडले आहे. या बंधाºयाच्या अंदाजपत्रकास मान्यता देऊन तात्काळ बंधाºयाचे काम सुरु करण्यासाठी शेंदुरवादा परिसरातील शेतकºयांनी २० नोव्हेंबरला सचिव एकनाथ डवले यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शिवप्रसाद अग्रवाल, विनायक दुबिले, अशोक निकम, असीफ शहा, अहेमद कुरैशी, कृष्णा शेळके, रामेश्वर म्हैसमाळे, अरुण शेळके, ताराचंद दुबिले, सुलेमान ताडे, जयराम जैस्वाल आदी शेतकºयांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या बंधाºयामुळे परिसरातील जवळपास ३५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या धामोरी-शिवपुर कोल्हापुरी बंधाºयास मंजुरी दिली होती.

Web Title:   Thamori-Shivpura Kolhapuri dam pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.