‘थँक्यू डॉ. आंबेडकर’; भीम जयंतीनिमित्त तरुणाईचा नावीण्यपूर्ण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 07:12 PM2021-04-13T19:12:53+5:302021-04-13T19:15:53+5:30

‘Thank you Dr. Ambedkar '; Innovative concept on Bhim Jayanti in Aurangabad डिस्प्ले भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘Thank you Dr. Ambedkar '; Innovative concept of youth on the occasion of Bhim Jayanti in Aurangabad | ‘थँक्यू डॉ. आंबेडकर’; भीम जयंतीनिमित्त तरुणाईचा नावीण्यपूर्ण उपक्रम

‘थँक्यू डॉ. आंबेडकर’; भीम जयंतीनिमित्त तरुणाईचा नावीण्यपूर्ण उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देजयंतीनिमित्त भडकलगेट येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी येत असतात.आता अभिवादनासोबत तेथे बाबासाहेबांप्रती कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी हा फलक लावण्यात आला आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा उपक्रमशील जयंती म्हणून साजरी करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे. शहरातील काही तरुणांनी स्वखर्चातून ‘थँक्यु डॉ. आंबेडकर’ असा तयार केलेला डिस्प्ले भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अमोल भालेराव, अमोल साळवे या तरुणांच्या डोक्यातून आलेली ही भन्नाट कल्पना असून विजयराव साळवे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, विशाल बोर्डे, अनमोल लिहिणार,अमोल कतले, विशाल बनकर यांनी त्यासाठी सहकार्य केले आहे.

जगभर कोरोनाने थैमान घातले असून सण, उत्सवाच्या उत्साहाची जागा भीतीने घेतली आहे. यातच सलग दोन वर्ष भीमजयंती साजरी न करता आल्याने आंबेडकरी युवकांत निराशा आलेली होती. यंदा लोकोपयोगी उपक्रम राबवून भीमजयंती साजरी करण्यात येत आहे. यापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेने स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहराच्या सौंदर्यात भर घालण्याकरिता ‘लव्ह औरंगाबाद’ हे डिस्प्ले बोर्ड उभारले आहेत. त्या धर्तीवर ‘थँक्यू डॉ. आंबेडकर’ हा डिस्प्ले तयार केला आहे.

जयंतीनिमित्त भडकलगेट येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी येत असतात. आता अभिवादनासोबत तेथे बाबासाहेबांप्रती कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी हा फलक लावण्यात आला आहे. केवळ आंबेडकरी अनुयायीच नव्हे, तर देशातील सर्व शोषित पीडित वंचित घटकांसाठी बाबासाहेबांचा संघर्ष होता. या फलकातून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याची आमची भूमिका असल्याचे अमोल भालेराव व अमोल साळवे यांनी सांगितले. दरम्यान, या डिस्प्लेचे अनावरण कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते न करता लहान मुलाच्या हाताने करण्यात आले, हे विशेष!

मास्कचे मोफत वितरण
नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेअर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने उद्या भीमजयंतीनिमित्त ३ हजार मास्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘मुक्ती कोण पथे’ या ग्रंथाच्या ५०० प्रतिंचे वितरण करण्यात येणार आहे.

पैठणगेट येथे रक्तदान
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. पैठण गेट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. अरुण शिरसाट, भीमशक्तीचे शहराध्यक्ष संतोष भिंगारे, सतीश नरवाडे, शांतीलाल गायकवाड, विजय गाडेकर, ऋषिकेश गायकवाड, सागर हनवते यांनी केले.

Web Title: ‘Thank you Dr. Ambedkar '; Innovative concept of youth on the occasion of Bhim Jayanti in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.