ती डुप्लिकेट अन् चोरलेली शिवसेना; ही लढाई गद्दार विरुद्ध...; चंद्रकांत खेरै यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 07:32 PM2024-04-21T19:32:58+5:302024-04-21T19:33:34+5:30
...यासंदर्भात बोलताना, ती (शिवसेना (शिंदे)) शिवसेना नाहीच, आमचीच शिवसेना पक्की आहे. ती शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे. चोरलेली शिवसेना आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
महायुतीकडून आमदार संदिपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, एमआयएमकडून इम्तियाज जलील तर शिवसेना शिंदेकटाकडून संदिपान भूमरे मैदानात असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, छत्रपती संभाजीनगरात शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत पहिल्यांदाच होणार आहे. यासंदर्भात बोलताना, ती (शिवसेना (शिंदे)) शिवसेना नाहीच, आमचीच शिवसेना पक्की आहे. ती शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे. चोरलेली शिवसेना आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
खैरे म्हणाले, "विरोधकांना कधीही कमी न समजता, ते खूप मोठे आहेत आणि आपल्याला त्यांना पराभूत करायचे, साफ करायचे या ईर्षेने आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागलेलो आहोत. हा शिवसेना प्रमुखांचा गड असल्याने हा कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व एकनिष्ठांचं नेतृत्व आहे. गद्दार विरुद्ध एकनिष्ठ, निष्ठावान, ही लढाई होणार. संभाजीनगरची जनता ती कधीही गद्दारांना जवळ करत नाही, माफही करत नाही, गद्दारांना मातीत टाकते." खैरे एबीपी माझासोबत बोलत होते.
ती डुप्लिकेट शिवसेना -
"शिवसेना विरुद्ध शिवसेना या मुद्द्यावर बोलताना खैरे म्हणाले, ती शिवसेना नाहीच, आमचीच शिवसेना पक्की आहे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना. ती शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे. चोरलेली शिवसेना आहे. धनुष्यबानही चोरला. सगळं काही चोरलं. मुळ शिवसेना लोकांना माहीत आहे," असेही खैरे म्हणाले. तसेच, आपली लढाई एमआयएमसोबत असल्याचेही खैरे यायांनी म्हणाले आहे."
आमची लढाई एमआयएम सोबत -
तत्पूर्वी, दानवे म्हणाले, "संदिपान भुमरे हे आव्हान असेल असे वाटत नाही. आमची लढत एमआयएम सोबत होईल, असे मला आताच्या घडीला तरी वाटते. भविष्यात सांगता येत नाही. पण आताच्या घडीला पाहिले तर एमआयएम सोबतच खैरे साहेबांची म्हणजेच आमच्या शिवसेनेची फाइट होइल असे दिसते."