प्रशासनाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदीचे आदेश

By विकास राऊत | Published: November 1, 2023 01:09 PM2023-11-01T13:09:29+5:302023-11-01T13:13:39+5:30

मराठा व धनगर आरक्षणावरून जिल्ह्यात मोर्चे, आंदोलने होत आहेत.

The administration orders ban on gatherings in Chhatrapati Sambhajinagar district rural area | प्रशासनाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदीचे आदेश

प्रशासनाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमावबंदीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने ग्रामीण पोलिस अधीक्षक हद्दीत १ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश लागू केले आहेत.

मराठा व धनगर आरक्षणावरून जिल्ह्यात मोर्चे, आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले, लोकांनी एकत्र येण्यास बंधने नाहीत. परंतु सोशल मीडियात समाज हानिकारक एसएमएस टाकणे, दगडफेकीच्या उद्देशाने जमा होणे, शस्त्र, अमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कारवाईच्या अनुषंगाने हे आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे, मोर्चे, आंदोलने करण्यास जिल्ह्यात बंदी असणार आहे.

जिल्ह्यात ६८४ कुणबी जातीच्या नोंदी
दरम्यान, जिल्ह्यात कुणबी जातीचा उल्लेख असलेल्या ६८४ नोंदी आढळल्या आहेत. २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखांची तपासणी केल्यानंतर या नोंदी आढळल्या. अशी माहिती सूत्रांनी दिली. शासनाच्या अध्यादेशानुसार संबंधितांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. असे सूत्रांनी सांगितले. महसूल अभिलेखात ३३६, शैक्षणिक अभिलेखात २३९, कारागृह अधीक्षक १६, मुद्रांक विभाग, सेवा अभिलेखात प्रत्येकी १, भूमी अभिलेखात ९१ अशा एकूण कुणबी जातीच्या ६८४ नोंदी आढळल्या आहेत. ११ विभागातील ४४ प्रकारची अभिलेखे प्रशासनाने तपासली. यामध्ये महसुली अभिलेखे १५३५३४७, जन्म मृत्यू नोंदी १२५५९, शैक्षणिक अभिलेखे ३५४२११, कारागृह अधीक्षक १४२७०, पोलीस विभाग १५०५६, मुद्रांक विभाग ८९४३६, भूमी अभिलेख २८८०१९, वक्फ बोर्ड ५६५, १९६७ पूर्वीच्या सेवापुस्तिका १९८ अशा एकूण २३ लाख ९ हजार ६६१ अभिलेखे तपासण्यात आले.

Web Title: The administration orders ban on gatherings in Chhatrapati Sambhajinagar district rural area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.