तारुण्यातच जेलची हवा, देशात अडीच लाख कैदी अवघ्या तिशीतले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 06:01 AM2023-12-23T06:01:35+5:302023-12-23T06:01:43+5:30

चिंताजनक अहवाल : महाराष्ट्र ४१ हजार कैद्यांसह चौथ्या क्रमांकावर, २१.२% कैदी एकट्या उत्तर प्रदेशच्या तुरूंगात 

The air of prison in youth, two and a half lakh prisoners in the country are only in the thirtieth | तारुण्यातच जेलची हवा, देशात अडीच लाख कैदी अवघ्या तिशीतले 

तारुण्यातच जेलची हवा, देशात अडीच लाख कैदी अवघ्या तिशीतले 

- सुमित डोळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : गेल्या तीन वर्षांमध्ये देशात ११ कारागृहे आणि १९ हजार १८६ कैदीही वाढले आहेत. एकूण ५ लाख ७३ हजार २२० कैद्यांमध्ये २ लाख ५६ हजार १६९ कैदी तिशीतील असून, त्यापैकी २ लाख २८ हजार ३६९ कैदी हे दहावीदेखील उत्तीर्ण नाहीत. २५.६% कैदी हे निरक्षर असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आली आहे. देशातील कारागृहांमध्ये १ हजार ५३७ महिला गुन्हेगार त्यांच्या मुलांसह शिक्षा भोगत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत तीन फौजदारी विधेयके मंजूर केली.  वेळी देशात वाढलेली गुन्हेगारी, दोषमुक्ती प्रक्रिया व न्याय मिळण्यात होणाऱ्या विलंबावर सखोल चर्चा झाली.  

उत्तर प्रदेश कारागृहात कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक
n२५% कैद्यांचा मृत्यू झाला  हृदयविकाराच्या झटक्याने 
n२.२ टक्के मृत्यू हे दारू व अन्य अमली पदार्थ न मिळाल्याने 
nतर ६ टक्के कैद्यांचा कर्करोगाने मृत्यू

हेही रंजकच तुरुंगात गॅंगवार
सर्वाधिक २७ गँगवार पंजाब कारागृहात घडले. महाराष्ट्रात ७, तर हरयाणात ६ गँगवारच्या घटना.
विदेशी कैद्यांमध्ये १,०७० महिला, तर १५ ट्रान्सजेंडर

९,०८४ कैद्यांना मानसिक आजार
५६.७% कैदी जन्मठेपेची, तर १५.६% कैदी १०-१३ वर्षांची शिक्षा भोगत आहे.

खुनाचे कैदी सर्वाधिक
६३.२% केदी खुनाच्या गुन्ह्यात, १८% बलात्कार, ७.१% खुनाचा प्रयत्न, ०.७% विनयभंगात शिक्षा भोगत आहेत.

Web Title: The air of prison in youth, two and a half lakh prisoners in the country are only in the thirtieth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग