घाटी रुग्णालयाच्या दुरावस्थेची खंडपीठाकडून गंभीर दखल, सरकारी वकील पाहणीसाठी रुग्णालयात दाखल
By संतोष हिरेमठ | Published: October 7, 2023 02:32 PM2023-10-07T14:32:56+5:302023-10-07T14:33:25+5:30
घाटीतील स्वच्छता आणि इतर सोयीसुविधांची पाहणी केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : उच्च न्यायालयाचे सरकारी वकील घाटी रुग्णालयात पाहणी करण्यासाठी दाखल झाले. घाटीतील स्वच्छता आणि इतर सोयीसुविधांची पाहणी केली जात आहे.
खासदार इम्तियाज जलील याचिकेत आज उच्च न्यायालयाने घाटीच्या विविध समस्या व तक्रारी संबंधी गंभीर दखल घेत आजच तात्काळ घाटी रुग्णालयात पाहणी करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने दुपारी वाजता घाटी रुग्णालयात सरकारी वकील ॲड. सुजीत कार्लेकर, खासदार इम्तियाज जलील, ॲड. प्रसाद जरारे व इतर पाहणीसाठी दाखल झाले. यावेळी अधिष्ठाता डॉ.संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांची उपस्थिती आहे.
माध्यमांना 'नो एन्ट्री'
या पाहणीदरम्यान माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला. माध्यमांनी खा. जलील यांना यासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर केवळ अपघात विभागपर्यंत माध्यमांना प्रवेश देण्यात आला.