पैठण-पाचोड रोडवरील पूल परिसर ठरतोय मृत्यूचा सापळा; ट्रकच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 06:19 PM2022-08-23T18:19:00+5:302022-08-23T18:19:45+5:30

लेकीची आधार नोंदणी केली, घराकडे परताना ट्रकने उडवले 

The bridge area on Paithan-Pachod road is becoming a death trap; father-daughter died in a collision with a truck | पैठण-पाचोड रोडवरील पूल परिसर ठरतोय मृत्यूचा सापळा; ट्रकच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू 

पैठण-पाचोड रोडवरील पूल परिसर ठरतोय मृत्यूचा सापळा; ट्रकच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू 

googlenewsNext

पैठण (औरंगाबाद) : पैठण-पाचोड रोडवरील डावा कालवा पुलाच्या परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात खेर्डा गावातील बाप लेकीचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. डावा कालवा पुलाच्या आसपास  वारंवार अपघात होऊन जीवितहानी होत असल्याने परिसरास ब्लॅक स्पॉट घोषित करून उपाय योजना कराव्यात अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. 

सोमवारी झालेल्या अपघातात सतिश शिंदे (३२) व गायत्री उर्फ बबली शिंदे (६) रा खेर्डा ता. पैठण या बापलेकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी पैठण येथे मुलीची आधार कार्ड नोंदणी करुन दुचाकीवरून गावाकडे परत जात असताना बाप लेकिला मृत्यूने गाठले. सोमवारी  सतिष शिंदे हे  मुलगी गायत्री हीला घेऊन दुचाकीवरून पैठण शहरात आधार कार्ड नोंदणीसाठी आले होते. आधार नोंदणी करुन सतिष शिंदे दुचाकीवरून  गावाकडे परत जात असताना पैठण पाचोड रोडवर आयशर ट्रक व मोटारसायकलचा अपघात झाला. अपघातात चिमुकली गाडीवरून रस्त्यावर जोरदार अपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सतिष शिंदे  गंभीर जखमी झाले होते. 

पैठण पोलिसांनी जखमी सतिष शिंदे यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली. काही तासाच्या अंतराने बाप लेकीचा अपघाती मृत्यू झाल्याने खेर्डा गावात  हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आयशर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. सुधीर वाव्हळ करीत आहेत.

Web Title: The bridge area on Paithan-Pachod road is becoming a death trap; father-daughter died in a collision with a truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.