थंडी आली, तापमान घसरले; आता वीजबिल कमी येणार
By साहेबराव हिवराळे | Updated: November 8, 2023 13:50 IST2023-11-08T13:45:35+5:302023-11-08T13:50:01+5:30
दिवसाचा पारा ३३.४ अंशांवर जाऊन पोहोचला असून, रात्रीचे तापमान घसरत आहे.

थंडी आली, तापमान घसरले; आता वीजबिल कमी येणार
छत्रपती संभाजीनगर : थंडी आली असून, घरात पंखे, ए.सी. बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विजेची मागणी कमी होत आहे. मुळातच खेड्यात वीजपुरवठा अधूनमधून खंडित असतो. आता तर रात्रीचे तापमान घसरल्याने वीजबिल कमीच येणार आहे.
दिवसा गरमी, रात्री थंडी
दिवसाचा पारा ३३.४ अंशांवर जाऊन पोहोचला असून, रात्रीचे तापमान घसरत आहे. त्याकडे लक्ष देत असताना गरम पांघरुणाला पसंती दिली जात आहे. वीजबिल वाढणार म्हणून रूम हिटरही फार कमीजण वापरतात. अजून थंडीचा कडाका वाढणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात वीज मागणी घटली
जिल्ह्यात २५ टक्के विजेची मागणी सध्याच्या कालावधीत घटली आहे. त्याचा परिणाम वीज बचतीतून दिसून येणार आहे.
थंडीमुळे वीजवापर घटला
थंडीपासून बचाव करण्याचा सर्वांचा प्रयत्न सुरू झालेला दिसत आहे. विजेचा अतिवापर होत असलेली उपकरणे बंद केली जात आहे.
थंडीच्या काळात वापर घटतोच..
अति थंडी असेल आणि थंडीमुळे त्रास होत असेल तर रूम हिटरसारख्या साधनांचा वापर करावा लागतो. परंतु थंडीमुळे सध्या तरी २५ टक्के विजेचा वापर कमी झाल्याचे दिसत आहे. हिटर वापरावे, अशी अवस्था सध्या दिसत नाही.
- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण