घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस

By विकास राऊत | Published: April 29, 2023 07:34 PM2023-04-29T19:34:13+5:302023-04-29T19:34:23+5:30

डिसेंबर २०२२ अखेर घरोघरी पाइपमधून गॅस मिळेल, असे २ मार्च २०२२ रोजी भूमिपूजनप्रसंगी जाहीर केले होते.

The deadline for house-to-house gas is on gas! When will citizens get 30 percent cheaper gas? | घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस

घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरात डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पीएनजीतून (पाइप नॅचरल गॅस) घरोघरी गॅस पुरवठा होण्याची ‘डेडलाइन’ महापालिका आणि भारत गॅस रिसोर्सेस यांच्यातील वाटाघाटींमुळे ‘गॅस’वरच राहिली. मनपाने रस्ता खोदण्यासाठी जुन्या-नव्या दरांच्या घातलेल्या मर्यादेत सवलत मिळण्याचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात जाऊन आठ महिने झाले असून पुढे काहीही झाले नाही.

डिसेंबर २०२२ अखेर घरोघरी पाइपमधून गॅस मिळेल, असे २ मार्च २०२२ रोजी भूमिपूजनप्रसंगी जाहीर केले होते. मात्र, रस्ता खोदण्यासाठी जुन्या व नव्या दराने रक्कम आकारण्याचा निर्णय मनपाने घेतल्याने डेडलाइनला घरघर लागली आहे. शहरातील झोन क्र. ७ व ९ मधील २२७.७६ किमी पैकी ७० किमीच्या आसपास एमडीपीई पाइप टाकण्याचे काम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनपाने किती केली मागणी
मनपाने जून २०२२ मध्ये २२७ किमी रस्त्याच्या दुरुस्ती व निगराणीसाठी ३३२ कोटींची मागणी भारत गॅस रिसोर्सेसकडे केली होती. त्यात वाटाघाटी होऊन जुन्या दराने रक्कम घेण्याचे ठरले; परंतु, उर्वरित सात झोनमधील सुमारे ८५ वॉर्डात काम करण्यासाठी भारत गॅस रिर्साेसेस कंपनीला नव्या दराने रस्ते देखभाल- दुरुस्तीची रक्कम भरणे बंधनकारक केले.

म्हणे ३० टक्क्यांनी गॅस स्वस्त मिळणार
वार्षिक ७५ हजार कोटी रुपयांची औद्योगिक उलाढाल असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत घरोघरी गॅसपुरवठा होईल. हा गॅस ३० टक्क्यांनी स्वस्त असेल. वाळूज, शेंद्रा, बिडकीन, लासूर स्टेशन, रांजणगावमध्ये गॅस वितरणाचे नेटवर्क उभारता येईल. यामुळे नागरिकांना सिलिंडर नोंदणीची गरज राहणार नाही, असा दावा करण्यात येत आहे.

शहरात काय मिळणार?
सात लाख घरगुती गॅस जोडणी, चार हजार व्यावसायिक गॅस कनेक्शन, एक हजार कनेक्शन उद्योगांना, १०० ठिकाणी सीएनजी पंप सुरू करण्याचा दावा आहे तर भविष्यातील मराठवाड्यातील नेटवर्क येथूनच असणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांची माहिती अशी...
दोन ठिकाणी काम रखडले आहे. मुंबई, पुणेप्रमाणे रस्ते दुरुस्तीचे दर लावू नका. मनपा क वर्गात असल्यामुळे रस्ते दुरुस्ती दरांचा विचार करावा. या मागणीवर मनपा आयुक्तांनी इतर मनपाचे दर पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे.
- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

महापालिकेचे मत असे...
मागील चार महिन्यांत माझ्याकडे याप्रकरणी कुणीही संपर्क केलेला नाही. त्यामुळे या कामाबाबत नेमके काय धोरण ठरले आहे, हे आत्ताच सांगता येणार नाही.
- ए.बी. देशमुख, शहर अभियंता, मनपा

भारत गॅस रिसोर्सेसचे मत असे...
शहरात ११५ वॉर्डात सुमारे २ ते २,५०० किमीपर्यंत पीएनजी वितरणासाठी एमडीपीई पाइपचे जाळे अंथरावे लागणार आहे. झोन क्र. सातमध्ये ८० टक्के काम झाले आहे. झाेन क्र. नऊमध्ये काम अंतिम टप्प्यात आहे. मनपाच्या परवानगीवरच पुढील कामाची गती अवलंबून आहे.
- भारत गॅस रिसोर्सेस, स्थानिक प्रतिनिधी

Web Title: The deadline for house-to-house gas is on gas! When will citizens get 30 percent cheaper gas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.