विद्यापीठ अधिसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीतील २१३ उमेदवारांचा उद्या फैसला

By योगेश पायघन | Published: December 12, 2022 08:16 PM2022-12-12T20:16:57+5:302022-12-12T20:18:34+5:30

विद्यापीठ : अधिसभेच्या २५, विद्या परिषद ६, अभ्यासमंडळाच्या ५७ जांगासाठी मतमोजणी

The decision of 213 candidates in the second phase of the Dr.BAMU assembly elections tomorrow | विद्यापीठ अधिसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीतील २१३ उमेदवारांचा उद्या फैसला

विद्यापीठ अधिसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीतील २१३ उमेदवारांचा उद्या फैसला

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया मंगळवारी सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहे. तिन्ही प्रवर्गातील मतमोजणीचीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. कमी वेळेत मतमोजणी होऊन निवड प्रमाणपत्र तत्काळ वितरणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिसभेच्या २५ व विद्यापरिषदेच्या ६ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. क्रीडा विभागातील बॅडमिंटन हॉलमध्ये मंगळवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी तीन सत्रात मिळून ७० शिक्षक, १४० अधिकारी-कर्मचारी तसेच ३० वर्ग चार कर्मचारी अशी २४० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अधिष्ठाता, उपकुलसचिव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिसभेच्या विद्यापीठ शिक्षकांच्या ३ जागेसाठी ९ उमेदवार आणि १२८ मतदार, संस्थाचालकांच्या ४ जागांसाठी ८ उमेदवार आणि १६९ मतदार, प्राचार्यांच्या ८ जागेसाठी १४ उमेदवार आणि ७८ मतदार

महाविद्यालयीन शिक्षकांच्या १० जागांसाठी ३९ उमेदवार आणि २ हजार ५८७ तर विद्यापरिषदेच्या ६ जागांसाठी १९ उमेदवार तर १ हजार २४३ मतदार होते. विद्या परिषद या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार होते.

सिनेटमध्ये तिघे बिनविरोध, ३ जागा रिक्त
अधिसभेच्या तीन जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवार वैध ठरल्यामुळे या जागा बिनविरोध आल्या आहेत. यामध्ये संस्थाचालक महिला गटातून अर्चना बाळासाहेब चव्हाण- आडसकर, नितीन जाधव, डॉ.शिवदास शिरसाठ हे बिनविरोध निवडूण आले आहेत. अधिसभेसह विद्यापरीषदेच्या तीन जागा तीन जागा रिक्त राहिल्या आहेत.

१३ अभ्यास मंडळे बिनविरोध
४ विद्याशाखेतील ३८ अभ्यासमंडळासाठी निवडणूक झाली. यामध्ये मानव्यविद्या १३, विज्ञान व तंत्रज्ञान १३, वाणिज्य व व्यवस्थापन ५ तर आंतरविद्याशाखेतील ७ वअभ्यासमंडळाचा समावेश आहे. यातील ऊर्दू, मानसशास्त्र, मत्स्यशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरींग, प्राणीशास्त्र, एमबीए, बी.पी.एड, शैक्षणिक प्रशासन, शैक्षणिक तत्वज्ञान, शारीरिक शिक्षण शिक्षक या १३ अभ्यासमंडळाची निवडणुक बिनविरोध झाली.

६ अभ्यास मंडळाला मिळाले नाही पात्र उमेदवार
सबस्टेंटिव्ह लॉ, प्रोसिजर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स - टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग व एमसीए या ६ अभ्यासमंडळात एकही पात्र उमेदवार मिळाला नाही. उर्वरित एकूण १९ अभ्यासमंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यासाठी १२४ उमेदवार तर १ हजार २४३ मतदार होते.

Web Title: The decision of 213 candidates in the second phase of the Dr.BAMU assembly elections tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.