घरगुती वाद शिगेला पोहचला; सुनेने दंडुक्याने मारहाण करत सासूचा काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 06:18 PM2022-04-27T18:18:34+5:302022-04-27T18:19:50+5:30

चक्कर येऊन पडल्या, असा बनाव करून सूनेने सासूला पैठण येथील रूग्णालयात दाखल केले

The domestic dispute reached high; Daughter-in-law killed her mother-in-law by beating in Aurangabad | घरगुती वाद शिगेला पोहचला; सुनेने दंडुक्याने मारहाण करत सासूचा काटा काढला

घरगुती वाद शिगेला पोहचला; सुनेने दंडुक्याने मारहाण करत सासूचा काटा काढला

googlenewsNext

पैठण ( औरंगाबाद) : घरगुती कारणावरुन सुनेने लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत सासूचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी सकाळी घडली आहे. विशेष म्हणजे, सासू चक्कर येऊन पडल्या, असा बनाव करून सूनेने सासूला पैठण येथील रूग्णालयात आणले मात्र अंगावरील जखमांनी सुनेचे बिंग फुटले. कौशल्याबाई अंबादास हरवणे (४५) असे मृत सासूचे नाव आहे. तर कांचन गणेश हरवणे (२२) असे मारहाण करणाऱ्या सुनेचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून नात्यातील वीण उसवल्याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

पाटेगाव येथील रहिवासी व मोलमजुरी करुन पोट भरणारे हरवणे कुटुंबात सून कांचन गणेश हरवणे (२२) व सासू कौशल्याबाई अंबादास हरवणे यांच्यात नेहमी घरगुती कारणावरुन वाद होत असे. बुधवारी सकाळी असाच वाद झाल्याने संतप्त सून कांचन हिने सासू कौशल्याबाईला घरात लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत कौशल्याबाईस डोक्यात व पाठीवर मार बसल्याने कौशल्याबाई रक्ताच थारोळ्यात कोसळून बेशुद्ध पडल्या. यावेळी सुनाने सासुला सरकारी रुग्णालयात दाखल करुन चक्कर येऊन पडली असल्याचा बनाव केला. 

मात्र, पोलिसांनी मयत महिलेच्या अंगावर असलेल्या जखमांवरुन मारहाण झाल्याच्या संशयावरून सून कांचन ताब्यात घेतले आहे. मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पो.नि. किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: The domestic dispute reached high; Daughter-in-law killed her mother-in-law by beating in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.