चाकांची तपासणी करताना ड्रायव्हरने ट्रक पुढे नेला; क्लीनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:08 PM2022-08-03T17:08:10+5:302022-08-03T17:08:38+5:30
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडीमुळे ट्रक कालीमठ फाट्याजवळ थांबला होता.
कन्नड (औरंगाबाद) : क्लीनर चाकाची तपासणी करत असतांना चालकाने गाडी सुरु करून पुढे नेल्याने मोठा अनर्थ घडला आहे. तपासणी करणारा क्लीनर चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला आहे. हृदयद्रावक घटना सोलापुर - धुळे महामार्गावरील कालीमठ फाट्यावर मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
मणुर ( ता. वैजापुर) येथुन एक ट्रक (कएमएच २० इएल ७७२९) कन्नडमार्गे गुजरातकडे मंगळवारी रवाना झाला होता. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडीमुळे ट्रक कालीमठ फाट्याजवळ थांबला. काही वेळाने क्लीनर किरण रमेश दवंगे (२४,रा. मणुर ता. वैजापुर) चाकांची तपासणी करण्यासाठी ट्रकखाली उतरला. तपासणी सुरु असतानाच चालकाने ट्रक सुरु करून पुढे घेतली. त्याचवेळी किरण चाकाखाली चिरडला गेला.
फिर्यादीचा भाऊ कुणाल दवंगे याच्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंदन स्वरूपचंद ( राजपुत रा. खापरखेडा ता. कन्नड ) याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप कनकुटे करीत आहेत. ट्रकचालकास पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.