कारागृहाबाहेर येताच आणखी एक गुन्हा; विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा रिक्षाचालक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 05:11 PM2024-08-30T17:11:52+5:302024-08-30T17:12:09+5:30

दहा दिवसांपूर्वीच आला होता कारागृहाबाहेर

The driver who committed obscene acts in front of a student in a running rickshaw was arrested | कारागृहाबाहेर येताच आणखी एक गुन्हा; विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा रिक्षाचालक अटकेत

कारागृहाबाहेर येताच आणखी एक गुन्हा; विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा रिक्षाचालक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : तुला पैसे लागतात का, असे म्हणत रिक्षाचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर पॅण्ट काढून अश्लील कृत्य केले. २३ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेतील विकृत चालक समीर बाबा पठाण (३०, रा. सईदा कॉलनी) याला वेदांतनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणारी वाळूजची १७ वर्षीय मुलगी नियमित वाळूजवरून महावीर चौक व तेथून दुसऱ्या रिक्षाने महाविद्यालयात ये-जा करते. २३ ऑगस्ट रोजी महावीर चौकात उतरून ती दुसऱ्या रिक्षात बसली. तेव्हा चालक समीरने सुरुवातीला तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रिक्षा रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असताना अचानक पॅण्ट अर्धवट खाली करून अश्लील कृत्य केले. मुलीने आरडाओरड सुरू केल्याने त्याने पळ काढला होता.

मूळ घरही बदलले
घटनेत गुन्हा दाखल झाल्याचे कळताच समीर पसार झाला. रोजाबाग येथील घर सोडून बेगमपुऱ्यात सईदा कॉलनीत भाड्याने घर घेऊन कुटुंब तेथे हलवले. त्यानंतर नाशिक, मालेगाव, खुलताबाद, हर्सूल, सिटी चौकातील नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला. गुरुवारी निरीक्षक प्रवीणा यादव यांना तो ओव्हर गावात आल्याचे कळताच त्यांनी उपनिरीक्षक वैभव मोरे यांना आदेश दिले. मोरे यांनी अंमलदार बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, रंजूसिंग सुलाने, प्रवीण मुळे यांच्यासह धाव घेत त्याला अटक केली.

२५ जूनच्या घटनेत आरोपी
परधर्मातील तरुणासोबत बोलत असल्याच्या संशयावरून मुलीवर पाळत ठेवून तरुण, तरुणीला टोळक्याने मारहाण केली होती. २५ जून रोजी लेबर कॉलनीच्या मोकळ्या जागेवर ही घटना घडली होती. त्यात समीर अग्रगणी होता. त्यावेळी अटक झाल्यानंतर १८ दिवस कारागृहात होता. जामिनावर सुटल्यावर त्याने हे कृत्य केले.
.. 
 

Web Title: The driver who committed obscene acts in front of a student in a running rickshaw was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.